शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगारांचा निर्दयीपणा, शंभर रुपयांसाठी जोरजोरात हसत मित्राच्याच हत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 12:00 IST

मुकुंदवाडी, पुंडलिकनगरमध्ये गुन्हेगारांचा पुन्हा राडा : खुनाच्या प्रयत्नाच्या दोन घटना

छत्रपती संभाजीनगर : मुकुंदवाडी, पुंडलिकनगरमधील गुन्हेगारांच्या टोळीची दहशत, निर्दयीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. दारू पिण्यासाठी शंभर रुपये न दिल्याच्या रागातून गुन्हेगारांनी मित्राच्याच पोटात चाकूने सपासप वार करून जोरजोरात हसत खुनाचा प्रयत्न केला. रविवारी मध्यरात्री विश्रांतीनगरमध्ये घडलेल्या घटनेत गजानन पांडुरंग खालापुरे (२५, रा. आनंदनगर) हा गंभीर जखमी झाला.

रोहित घुले, चिंग्या ऊर्फ संदेश खडके, सचिन देविदास भवाळ, शेख अल्ताफ शेख मुबारक अशी आरोपींची नावे आहेत. ११ मे रोजी रात्री ११:४५ वाजता गजानन मुकुंदवाडी रेल्वे स्थानकावरून घरी जात होता. आरोपींनी विश्रांतीनगरजवळ त्याला थांबवत दारूसाठी १०० रुपयांची मागणी केली. गजाननने पैसे देण्यास नकार दिला. तेवढ्यात अल्ताफने त्याचे हात पकडताच राेहितने थेट धारदार चाकूने त्याच्या पोटात वार केले. चिंग्याने डोक्याचे केस पकडून पाठीत चाकूने सपासप वार केले. गजानन रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असताना आरोपी जोरजोरात हसत त्याच्या जखमांवर पायाने मारत आरडाओरड करत होते. हा धिंगाणा ऐकून स्थानिकांनी धाव घेताच आरोपींनी पळ काढला. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर गजाननच्या जबाबावरून मंगळवारी पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सर्व आरोपी रेकॉर्डवरचे गुन्हेगार असून, त्यांचा शोध सुरू असल्याचे निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी सांगितले.

मारहाण केल्याचा राग, तरुणावर जीवघेणा हल्लादुसऱ्या घटनेत मारहाणीच्या आरोपातून रोहित शाहाराव (२१, रा. गणेशनगर) याच्यावर तीन गावगुंडांनी जीवघेणा हल्ला करत हत्येचा प्रयत्न केला. ११ मे रोजी रात्री १२ वाजता रोहितच्या घरासमोर कृष्णा ऊर्फ कल्ल्या माणिक साळुंके, अमन पटेल व एजाज ऊर्फ इज्जू सय्यद यांचे मंडप व्यावसायिक सुनील वाघ साेबत वाद झाले होते. त्यात भांडणात रोहितने मारहाण केल्याचा आरोपातून तिघांनी त्याला काही वेळाने गणेशनगरमध्ये पकडले. पाठीत चाकूने सपासप वार करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी पुंडलिकनगर पाेलिस ठाण्यात एजाज, अमनसह कृष्णावर गुन्हा दाखल करण्यात आला. यातील कल्ल्यावर यापूर्वी गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी