शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकरी मदतीचा मुद्दा गाजला; कृषिमंत्री आधी म्हणाले, ‘नाही’ नंतर म्हणाले, ‘हो, प्रस्ताव आला’
2
आजचे राशीभविष्य, ४ डिसेंबर २०२५: अचानक धनप्राप्ती अन् विविध फायदे होतील, ज्याने आनंदित व्हाल
3
रुपया नव्वदीपार, गाठला ऐतिहासिक तळ; महागाई वाढणार, विद्यार्थ्यांपासून गृहिणींपर्यंत सर्वांना बसणार फटका
4
Orange Gate Tunnel: सोळा मजली उंच इमारतीइतक्या खोल, ७०० इमारतींखालून जाणार ऑरेंज गेट बोगदा
5
लंकादहन: भाजप-शिंदेसेनेतील वाद गाजला, सत्तापक्षांतील वादांचे निवडणुकीत झाले प्रदर्शन
6
Indigo Flights Issue: ...म्हणून इंडिगोची सेवा ढेपाळली; १०० पेक्षा जास्त विमाने झाली रद्द
7
राज्यात सरासरी ६७.६३% मतदान; तळेगाव दाभाडे तळात, तर कोल्हापुरातील मुरगूड अव्वल 
8
Aadhar Card Update: आता घरबसल्या अपडेट करा 'आधार', नाव, मोबाइल, पत्ता घरीच बदलता येणार
9
नवी मुंबईतील शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश
10
मुंबईसह देशभर विमानतळांवर गोंधळ, २०० विमाने झाली रद्द; बोर्डिंग पास हाताने लिहिण्याची आली वेळ 
11
महामुंबईतील १९ आरएमसी प्लांट बंद, तीन उद्योगांची प्रत्येकी पाच लाखांची बँकहमी जप्त
12
महाडमध्ये दोन गटांतील राड्याप्रकरणी विकास गोगावलेंसह २० जणांवर गुन्हा, परस्परविरोधी तक्रारी दाखल
13
इंडिगोची दोन्ही विमाने रद्द; १२ तास ताटकळले संभाजीनगरकर
14
IND vs SA : मार्करमच्या सेंच्युरीच्या जोरावर द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम; ऐतिहासिक विजयासह साधला बरोबरीचा डाव
15
“माझ्या भावाला BJPशी मैत्री हवी, पण मुनीर भारताशी युद्ध…”; इम्रान खानची बहीण नेमके काय म्हणाली?
16
IND vs SA Turning Point Of The Match : ती एक चूक नडली! यशस्वीमुळे टीम इंडिया ठरली अपयशी
17
दिल्ली पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का, काँग्रेसने खाते उघडले; आम आदमी पक्षाचे काय झाले?
18
२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?
19
IND vs SA : पंचांनी चेंडू बदलून दिला, पण... KL राहुलनं कोणावर फोडलं पराभवाचं खापर?   
20
नगर पंचायत-परिषदा निवडणुकीचा मुद्दा संसदेत; सुप्रिया सुळेंचे सरकारवर टीकास्त्र, म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

'स्टिलबर्थ' चे प्रमाण वाढले! छत्रपती संभाजीनगरात वर्षभरात ७६७ बाळांनी जन्माआधीच डोळे मिटले

By संतोष हिरेमठ | Updated: May 23, 2025 13:45 IST

मृत शिशू जन्म ही केवळ वैयक्तिक शोकांतिका नसून, आरोग्य व्यवस्थेसाठीही गंभीर बाब मानली जाते.

छत्रपती संभाजीनगर : बाळाच्या आगमनाचा क्षण हा प्रत्येक कुटुंबासाठी उत्कंठा व आनंदाचा क्षण असतो. मात्र, काही जणांसाठी हा क्षण अपार दु:खात बदलून जातो. कारण कधी-कधी जन्माआधीच शिशूंनी डोळे मिटलेले असतात. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडळांतर्गत असलेल्या ४ जिल्ह्यांत गेल्या वर्षभरात छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक म्हणजे १२.१८ टक्के मृत शिशूंचा जन्म झाल्याचे समोर आले.

मृत शिशू जन्मास येण्याची आरोग्य विभागात ‘स्टिल बर्थ’ म्हणून नोंद केली जाते. मृत शिशू जन्म ही केवळ वैयक्तिक शोकांतिका नसून, आरोग्य व्यवस्थेसाठीही गंभीर बाब मानली जाते. २०२४-२५ या वर्षात मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली या चार जिल्ह्यांतील मृत शिशू जन्मांची नोंद घेतली असता चिंताजनक आकडे समोर आले आहेत. त्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रसूतींचे आणि मृत शिशू जन्माचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

चार जिल्ह्यांतील स्थिती (२०२४-२५)जिल्हा - एकूण प्रसूती - जिवंत जन्म - मृत शिशू जन्म - मृत शिशू जन्म दरछत्रपती संभाजीनगर- ६२,९४९ - ६२,१८२ - ७६७ - १२.१८ टक्केजालना-२२,५०७- २२,४२२- ८५ - ३.७८- टक्केपरभणी -१६,४६६ - १६,३६५ -१०१ - ६.१३ टक्केहिंगोली - १४,४७१- १४,३८३ - ८८ - - ६.०८ टक्केएकूण - १,१६,३९३- १,१५,३५२ - १,०४१ - ८.९४ टक्के

स्टिलबर्थ म्हणजे काय?स्टिलबर्थ (मृत शिशू जन्म) म्हणजे गर्भधारणेच्या २० व्या आठवड्यानंतर गर्भातच किंवा प्रसूतीदरम्यान शिशूचा मृत्यू होणे. अशा वेळी मूल जन्माला येते, पण त्यात कोणतीही जीवनचिन्हे (श्वास, हृदयाचे ठोके, हालचाल) नसतात.

नवजात शिशूच्या मृत्यूची काही कारणे- गुंतागुंतीच्या अवस्थेत प्रसूतीसाठी येणे.- मधुमेह, उच्च रक्तदाब यासारखे आजार.- गरोदर मातेला ॲनिमिया.- गरोदर मातांच्या आहाराकडे दुर्लक्ष.- औषधोपचारांकडे दुर्लक्ष.- आरोग्य केंद्रांऐवजी घरगुती उपचार.- नियमित तपासणी टाळून थेट प्रसूतीसाठी जाणे.- सोनोग्राफीअभावी गर्भातील स्थिती न समजणे.- नवजात शिशूला जंतुसंसर्ग.- नवजात शिशूचे वजन कमी असणे.

रेफरचे प्रमाण अधिकछत्रपती संभाजीनगरमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) आहे. याठिकाणी जिल्ह्यातून, जिल्ह्याबाहेरून ‘रेफर’ रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे जिल्ह्यात ‘स्टिल बर्थ’चे प्रमाण अधिक आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी गरोदर मातांनी नियमितपणे तपासणी केली पाहिजे. आरोग्य विभागाकडून विविध योजनांच्या माध्यमातून त्यासाठी प्रयत्न केला जातो. ॲनिमिया दूर होण्यासाठी आयर्नच्या गोळ्या दिल्या जातात.- डाॅ. कांचन वानेरे, आरोग्य उपसंचालक

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरpregnant womanगर्भवती महिलाHealthआरोग्य