शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लंच पे चर्चा’! राज ठाकरे आईसोबत पुन्हा मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंसोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम
2
“दादा भुसेंचे ट्रम्प यांच्याशी घनिष्ट संबंध असतील, पालकमंत्रीपद...”; गिरीश महाजनांचा टोला
3
तुम्हीही होऊ शकता कोट्यधीश! विद्यार्थी, गिग वर्कर्ससाठी 'मायक्रो SIP' चा नवा सुपरहिट ट्रेंड
4
"जर तुम्ही कॉफी बनवायला शिकला असाल तर...", राहुल गांधींच्या दक्षिण अमेरिका दौऱ्यावर भाजपचा निशाणा
5
“तरे म्हणाले होते हा माणूस दगा देईल, तेच झाले, आता पश्चाताप झाला नसता”; ठाकरेंची शिंदेवर टीका
6
नोकरीच्या बचतीची चिंता सोडा! 'या' ४ सोप्या मार्गांनी घरबसल्या तपासा तुमचा PF बॅलन्स
7
Pune Crime: गर्लफ्रेंडच्या मोबाईलमध्ये दुसऱ्या पुरुषासोबतचे नग्न फोटो, बॉयफ्रेंडने केक कापायच्या चाकूनेच तरुणीची हत्या
8
घाईत घेतलेला निर्णय महागात; अमिताभ बच्चन यांनी मुलांच्या ओव्हर कॉन्फिडन्सवर टाकला प्रकाश
9
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पुन्हा पत्रकार परिषद घेणार, महिला पत्रकारांना विशेष आमंत्रण
10
अफगाणिस्तान vs पाकिस्तान; थेट युद्धात कोणाचे सैन्य वरचढ ठरेल? जाणून घ्या...
11
IND vs WI : बुमराहचा 'ट्रिपल फिफ्टी'चा रेकॉर्ड; वेळ घेतला; पण परफेक्ट यॉर्करसह साधला विकेटचा डाव
12
Rajya Sabha Election: भाजपने मुस्लीम नेत्याला उतरवले निवडणुकीच्या रिंगणात, तीन नावाची घोषणा
13
हवाई हल्ल्यानंतर तालिबानचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, १५ सैनिक ठार; अनेक प्रांतांमध्ये गोळीबार
14
IND vs WI : कुलदीपचा 'पंजा'! टीम इंडियानं पाहुण्या वेस्ट इंडिजला दिला फॉलोऑन
15
“ऑपरेशन ब्ल्यू स्टार चुकीच्या पद्धतीने राबवले, इंदिरा गांधींना किंमत मोजावी लागली”: चिदंबरम
16
स्कूल बस चालकाने टेम्पोची काच फोडत धमकी दिली; पुणे पोलिसांनी काही तासातच त्याच ठिकाणी गुडघ्यावर चालवले
17
मृत्यूनंतरही डिजिटल मालमत्तेची चिंता नाही! डिजिलॉकरमध्ये नॉमिनी कसा जोडायचा? जाणून घ्या सोपी प्रक्रिया
18
आधी मिठाई खायली दिली अन् नंतर ३ मुलांचा चिरला गळा; बायको माहेरी जाताच नवरा झाला हैवान
19
थिएटर मध्ये जाऊन "मनाचे श्लोक" चित्रपट बंद पाडणे उज्वला गौड यांना भोवले; गुन्हा दाखल
20
“वेळ पडल्यास लढायची तयारी, आम्ही घाबरत नाही”; १०० टक्के ट्रम्प टॅरिफवर चीनचे चोख प्रत्युत्तर

महापालिका पदाधिकाऱ्यांची दालने पाच वर्षांपासून कुलूपबंद! आता डागडुजीवर होणार लाखोंचा खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 17:30 IST

मागील पाच वर्षांपासून सर्वसाधारण सभेच्या सभागृहाचे काम सुरू असून, ते अजूनही अपूर्ण असल्याचे दिसून येते.

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेतील पदाधिकाऱ्यांची दालने मागील पाच वर्षांपासून कुलूपबंद आहेत. दालनांचा वापर नसल्याचे त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. त्यामुळे लवकरच प्रशासनाकडून दालनांची डागडुजी सुरू केली जाणार आहे. यावर लाखो रुपये खर्च अपेक्षित आहे. मागील पाच वर्षांपासून सर्वसाधारण सभेच्या सभागृहाचे काम सुरू असून, ते अजूनही अपूर्ण असल्याचे दिसून येते.

सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ४ महिन्यांत घेण्याचे आदेश दिले. दिवाळीपूर्वी किंवा नंतर महापालिका निवडणूक होईल, असा अंदाज लावण्यात येतोय. शहरातील मतदार आपल्या हक्काचा लोकप्रतिनिधी महापालिकेत पाठवतील. त्यानंतर महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सभागृहनेता, विरोधी पक्षनेता या पाच महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची निवड होईल. एप्रिल २०२० पासून महापालिकेत ‘कारभारी’ नसल्याने त्यांची दालनेही कुलूपबंद होती. स्थायी समिती सभापती, उपमहापौरांच्या दालनांचा वापर अधिकारी, कर्मचारी कोरोना संसर्गापासून करीत आहेत. सभापतींच्या कक्षात कोरोना वॉररूम तयार करण्यात आली होती. पत्रकारांनी बुधवारी पदाधिकाऱ्यांच्या कक्षांची पाहणी केली असता महापाैर, विरोधीक्षनेता, सभागृहनेत्यांची दालने कुलूपबंद होती. त्यांची अवस्था वाईट झाली आहे.

७९ लाखांचे अंदाजपत्रकमनपातील पाच पदाधिकाऱ्यांच्या दालनांची डागडुजी करण्यासाठी ७९ लाखांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली. लवकरच काम सुरू होईल. ज्या कामांना विलंब होणार ती कामे अगोदर केली जातील. पदाधिकारी येण्यापूर्वी कलर, वॉलपेपर आदी छोटी कामे शिल्लक ठेवली जातील, अशी माहिती उपअभियंता संजय चामले यांनी दिली.

सभागृहावर ४ कोटी खर्चसर्वसाधारण सभेच्या सभागृहाचे काम पाच वर्षांपासून सुरू आहे. या कामावर जवळपास ४ कोटींहून अधिकची रक्कम खर्च केल्याची माहिती समोर आली. आसन व्यवस्था, विद्युत, साऊंड सिस्टीम आदी सर्वच यंत्रणा बदलण्यात आली. सभागृहाच्या बाजूला नगरसेवकांना जेवणासाठी सभामंडपही तयार करण्यात आले.

दीडशे वाहने कुठे उभी राहणारनिवडून आलेले लोकप्रतिनिधी सर्वसाधारण सभेला आल्यावर त्यांना वाहने उभी करण्यासाठी मुख्यालयात जागा अपुरी पडणार आहे. मुख्यालयात प्रवेशद्वाराच्या बाजूला जवळपास २ हजार चौरस फूट जागेवर शौचालय बांधून ठेवण्याचा प्रताप प्रशासनाने केला आहे. ११५ किंवा १२६ नगरसेवक, २५ पेक्षा अधिक अधिकाऱ्यांची वाहने कुठे उभी राहणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका