छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनच्या जुन्या इमारतीवर अखेर हातोडा; पर्यायी प्रवेशद्वाराचा करा वापर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 13:13 IST2025-11-05T13:12:38+5:302025-11-05T13:13:43+5:30
नव्या इमारतीसाठी जुनी इमारत पाडण्याचे काम सुरू

छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनच्या जुन्या इमारतीवर अखेर हातोडा; पर्यायी प्रवेशद्वाराचा करा वापर!
छत्रपती संभाजीनगर :रेल्वे स्टेशनच्या सध्याच्या इमारतीवर अखेर हातोडा पडला आहे. रेल्वे स्टेशनच्या पुनर्विकासासाठी सध्याची इमारत पाडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. प्रवाशांना स्टेशनवर ये-जा करण्यासाठी पर्यायी प्रवेशद्वार करण्यात आले आहे.
छत्रपती संभाजीनगरकरांना २०२६ मध्ये अगदी परदेशाप्रमाणे सुसज्ज असे रेल्वे स्टेशन मिळणार आहे. या स्टेशनवर ४५० मीटरचे रूफ प्लाझा असणार आहे. चार दालने आणि इतर अनेक सुविधाही असणार आहेत. सध्या साताऱ्याच्या दिशेने म्हणजेच मालधक्का परिसरात इमारतीचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. त्यापाठोपाठ आता समोरील बाजूच्या कामानेही वेग धरला आहे. सध्याची रेल्वे स्टेशनची इमारत पाडण्यात येत आहे. या कामासाठी इमारतीच्या बाजूने पत्रे लावण्यात आले आहेत. प्रवाशांना ये-जा करण्यासाठी पर्यायी मार्ग करण्यात आला आहे. याच मार्गाजवळ विविध विभागांच्या कामकाजासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.