शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

महायुतीने तिघांच्या कोट्यातील ३-३ जागा रिपाइंला द्याव्यात; रामदास आठवले यांचा प्रस्ताव

By विजय सरवदे | Updated: October 5, 2024 14:49 IST

लोकसभा निवडणुकीत रिपाइंमुळे राज्यामध्ये १७ जागा निवडून आल्या, याचा विचार करून महायुतीच्या नेतृत्वाने रिपाइंला किमान ९ जागा दिल्या पाहिजे.

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीत रिपाइंमुळे महायुतीच्या अनेक जागा निवडून आल्या आहेत. त्यामुळे आम्हाला दुर्लक्षित करून चालणार नाही. विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या कोट्यातून आम्हाला प्रत्येकी ३-३ जागा द्याव्यात, अशी आमची मागणी आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे सांगितले.

रिपाइंच्या स्थानिक कार्यक्रमासाठी ते शनिवारी शहरात आले होते. त्यावेळी पत्रकार परिषदेत आठवले म्हणाले, लोकसभा निवडणुकीत रिपाइंमुळे राज्यामध्ये १७ जागा निवडून आल्या. पडलेल्या उमेदवारांच्या मतांमध्येही रिपाइंच्या मतांची टक्केवारी जास्त आहे. याचा विचार करून महायुतीच्या नेतृत्वाने रिपाइंला किमान ९ जागा दिल्या पाहिजे. तसे आम्ही १०-१२ जागांचा प्रस्ताव दिला आहे. याशिवाय,'एमएलसी'च्या १२ जागांपैकी १ जागा व २-३ महामंडळांवर आमच्या कार्यकर्त्यांची वर्णी लावली पाहिजे.

प्रकाश आंबेडकर मुत्सद्दी नेतेप्रकाश आंबेडकर हे मुत्सद्दी नेते आहेत. त्यांचा मला आदरच आहे. आम्ही दोघे एकत्र आलो तर राजकारणाचे चित्र वेगळे दिसेल. यासाठी मी मंत्रीपदाचा त्याग करायला सुद्धा तयार आहे. पण, हा प्रस्ताव त्यांना मान्य नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आणखी १०-१५ वर्षाचे आयुर्मान मिळाले असते तर ते या देशाचे पंतप्रधान राहिले असते. त्यांना समाज एकसंघ हवा होता. त्यामुळेच त्यांनी रिपब्लिकन पक्षाची संरचना तयार केली होती. 

बुद्धलेणीला धक्का लागणार नाहीबुद्धलेणीला भेट देऊन भिक्खू संघासोबत चर्चा केली. मराठवाड्यातील बौद्धांचे हे श्रद्धास्थान आहे. यासंदर्भात आपण सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना बोललो तेव्हा त्यांनी या परिसरातील एकाही वास्तुला धक्का लागणार नाही, असे आश्वासन दिले. ही जागा वनविभागाची असून भिक्खू संघाच्या मागण्यांबाबत आपण मुख्यमंत्र्यांना बोलणार आहे. त्यामुळे बौद्ध अनुयायांनी सोमवारचा महामोर्चा शांततेत काढावा. यावेळी बाबुराव कदम, मिलिंद शेळके, किशोर थोरात, संजय ठोकळ, विजय मगरे, बाळकृष्ण इंगळे, नागराज गायकवाड उपस्थित होते.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेAurangabadऔरंगाबादMahayutiमहायुतीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024