रिकव्हरी एजंट्सचा प्रताप; कंपनीसाठी कर्ज वसुली केली, पण लाखों रुपये मौजमजेसाठी उडवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 17:22 IST2025-01-17T17:21:48+5:302025-01-17T17:22:42+5:30

दोघांनी मिळून ७ लाख ७८ हजार ८६२ रुपये लंपास करुन पोबारा केला.

The glory of recovery agents; Recovered debt for the company, but blew lakhs of rupees for fun | रिकव्हरी एजंट्सचा प्रताप; कंपनीसाठी कर्ज वसुली केली, पण लाखों रुपये मौजमजेसाठी उडवले

रिकव्हरी एजंट्सचा प्रताप; कंपनीसाठी कर्ज वसुली केली, पण लाखों रुपये मौजमजेसाठी उडवले

छत्रपती संभाजीनगर : कंपनीच्या ग्राहकांकडून कर्ज वसुली करुन मिळालेले पैसे कंपनीत जमा करण्याऐवजी दोन कर्मचाऱ्यांनी स्वत:वरच उडवले. सुभाष स्वरुपचंद जोनवळ व श्याम एकनाथ मंडपे अशी आरोपींची नावेे असून, त्यांच्यावर पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

भारत फायनान्स इंक्लोजन या कंपनीत हा घोटाळा उघडकीस आला. कंपनीचे शाखा व्यवस्थापक विजय पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, जानेवारी ते डिसेंबर-२०२३ यादरम्यान आरोपी सुभाष व श्याम यांच्याकडे कंपनीकडून कर्ज घेतलेल्या ६० कर्जदारांकडून वसुली करण्याची जबाबदारी होती. मात्र, दोघांनी मिळून मिळालेल्या रकमपैकी काही अंतराने ७ लाख ७८ हजार ८६२ रुपये लंपास करुन पोबारा केला. उपनिरीक्षक अर्जुन राऊत याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Web Title: The glory of recovery agents; Recovered debt for the company, but blew lakhs of rupees for fun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.