शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पोळ्यानिमित्त देवीला नारळ फोडून परत येताना शेतकरी नदीत वाहून गेला; शोधकार्य सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 19:58 IST

शेतकऱ्याला शोधण्याची मोहीम प्रशासनाने सुरू केली असून अद्याप यश मिळाले नाही.

फुलंब्री ( छत्रपती संभाजीनगर) : तालुक्यातील शेवता येथील गिरीजा नदीच्या पुरात शेतकरी वाहून गेल्याची घटना सोमवारी चार वाजेच्या दरम्यान घडली. नदीच्या पलीकडे असलेल्या देवीला नारळ फोडून परत येत असता ही दुर्दैवी घटना घडल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, शेतकऱ्याला शोधण्याची मोहीम प्रशासनाने सुरू केली असून अद्याप यश मिळाले नाही.

शेवता बुद्रुक व शेवता खुर्द या दोन गावाच्या मधून गिरीजा नदी वाहते. सोमवारी पोळा सण असल्याने शेवता बुद्रुक येथील शेतकरी रावसाहेब नाना बेडके ( ४५)  हे दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान  शेवता खुर्द येथील देवीला नारळ फोडण्यासाठी गेले होते. जाताना नदीला पाणी कमी होते पण ते नारळ फोडून आल्या नंतर पाणी वाढले. परत येत असतान पाण्याचा अंदाज न आल्याने ते वेगाने वाहणाऱ्या प्रवाहात वाहून गेले. काही ग्रामस्थांनी हा प्रकार पहिला. मदतीसाठी आरडाओरड केला पण पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने वेळीच काही करता आले नाही. दरम्यान, शेवता येथील घटनेची माहिती मिळताच अग्निशमन यंत्रणा व एनडीआरएफला कळविण्यात आलेले आहे. शोध सुरू असल्याची माहिती तहसीलदार डॉ कृष्णा कानगुले यांनी दिली आहे.

पूल उभारण्याची अनेक वर्षांची मागणीशेवता खुर्द व शेवता बुद्रुक या दोन गावाच्यामधून गिरजा नदी वाहते. दोन्ही गावातील शेतकऱ्याच्या जमिनी दोन्ही कडे आहे. त्यांना नियमित नदी ओलांडावी लागते. तसेच नियमित रहदारी देखील खूप आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षापासून नदीवर पुल उभारण्याची मागणी दोन्ही गावातील ग्रामस्थांची आहे. २० सप्टेंबर २०२२ ला आम्हाला शाळेत जायचे आहे नदीवर पूल बांधून द्यावा, अशी मागणी करीत अनेक विद्यार्थ्यांनी नदीपात्रात उतरून आंदोलन केले होते. त्यानंतर ग्रामस्थांनी देखील आंदोलन केले होते, पण अजूनही पुलाच्या मागणीला शासनाने लक्ष दिले नाही. शेतकरी संघटनेचे साईनाथ बेडके यांनी या मागणीसाठी मंगळवार पासून नदीपात्रात जलआंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRainपाऊसFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र