शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

कारागृहाबाहेर येताच आणखी एक गुन्हा; विद्यार्थिनीसमोर अश्लील कृत्य करणारा रिक्षाचालक अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 17:12 IST

दहा दिवसांपूर्वीच आला होता कारागृहाबाहेर

छत्रपती संभाजीनगर : तुला पैसे लागतात का, असे म्हणत रिक्षाचालकाने अल्पवयीन विद्यार्थिनीसमोर पॅण्ट काढून अश्लील कृत्य केले. २३ ऑगस्ट रोजी घडलेल्या घटनेतील विकृत चालक समीर बाबा पठाण (३०, रा. सईदा कॉलनी) याला वेदांतनगर पोलिसांनी गुरुवारी अटक केली.

नामांकित पॉलिटेक्निक महाविद्यालयात तिसऱ्या वर्षात शिकणारी वाळूजची १७ वर्षीय मुलगी नियमित वाळूजवरून महावीर चौक व तेथून दुसऱ्या रिक्षाने महाविद्यालयात ये-जा करते. २३ ऑगस्ट रोजी महावीर चौकात उतरून ती दुसऱ्या रिक्षात बसली. तेव्हा चालक समीरने सुरुवातीला तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. रिक्षा रेल्वेस्थानकाच्या दिशेने जात असताना अचानक पॅण्ट अर्धवट खाली करून अश्लील कृत्य केले. मुलीने आरडाओरड सुरू केल्याने त्याने पळ काढला होता.

मूळ घरही बदललेघटनेत गुन्हा दाखल झाल्याचे कळताच समीर पसार झाला. रोजाबाग येथील घर सोडून बेगमपुऱ्यात सईदा कॉलनीत भाड्याने घर घेऊन कुटुंब तेथे हलवले. त्यानंतर नाशिक, मालेगाव, खुलताबाद, हर्सूल, सिटी चौकातील नातेवाईकांकडे मुक्काम ठोकला. गुरुवारी निरीक्षक प्रवीणा यादव यांना तो ओव्हर गावात आल्याचे कळताच त्यांनी उपनिरीक्षक वैभव मोरे यांना आदेश दिले. मोरे यांनी अंमलदार बाळाराम चौरे, विलास डोईफोडे, रंजूसिंग सुलाने, प्रवीण मुळे यांच्यासह धाव घेत त्याला अटक केली.

२५ जूनच्या घटनेत आरोपीपरधर्मातील तरुणासोबत बोलत असल्याच्या संशयावरून मुलीवर पाळत ठेवून तरुण, तरुणीला टोळक्याने मारहाण केली होती. २५ जून रोजी लेबर कॉलनीच्या मोकळ्या जागेवर ही घटना घडली होती. त्यात समीर अग्रगणी होता. त्यावेळी अटक झाल्यानंतर १८ दिवस कारागृहात होता. जामिनावर सुटल्यावर त्याने हे कृत्य केले...  

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी