निवडणुका रद्द करण्याचा निर्णय चुकीचा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवडणूक आयोगावर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 11:15 IST2025-12-01T11:13:06+5:302025-12-01T11:15:32+5:30
जिल्ह्यातील फुलंब्री नगर पंचायतीची निवडणूक प्रक्रिया रविवारी पुढे ढकलण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाची राज्यातील सर्व जिल्हा प्रशासनासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली.

निवडणुका रद्द करण्याचा निर्णय चुकीचा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवडणूक आयोगावर टीका
छत्रपती संभाजीनगर- निवडणूक आयोगाचा निवडणुका रद्द करण्याचा निर्णय अत्यंत चुकीचा आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयोगावर टीका केली .
या निर्णयानंतर विविध जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाला कळवून नाराजी व्यक्त केली. या संदर्भात लवकरच आम्ही निवडणूक आयोगाला निवेदन देणार आहोत, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. नगर परिषद निवडणूक प्रचार दौऱ्यावर जाण्यासाठी मुख्यमंत्री येथे मुक्कामी आले होते.
जिल्ह्यातील फुलंब्री नगर पंचायतीची निवडणूक प्रक्रिया रविवारी पुढे ढकलण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाची राज्यातील सर्व जिल्हा प्रशासनासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. सायंकाळपर्यंत आयोगाकडून काहीही सूचना आलेल्या नव्हत्या. त्यामुळे वरिष्ठांकडून काही अभिप्रायासह विचारणा केल्यानंतर कोर्टाने जो निकाल दिला आहे, त्यानुसार काही निवडणुका स्थगित होणार आहेत. त्यानुसारच फुलंब्रीची निवडणूक प्रक्रिया स्थगित केली. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ४ तारखेला नव्याने फुलंब्रीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाईल. इतर नगरपालिकेच्या काही प्रभागांतील निवडणूक प्रक्रिया स्थगित केलेली आहे. उर्वरित नगरपालिकांच्या निवडणुका ठरलेल्या वेळापत्रकानुसार होतील असं निवडणूक निर्णय तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले.