शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

वाळूजच्या परदेशवाडी तलावाची स्थिती चिंताजनक; पाणी पिण्यासह वापरण्यास व सिंचनास अयोग्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 17:08 IST

अहवालाने परिसरात खळबळ; कॅन्सर, हृदयविकार, त्वचारोगाचा धोका, मनुष्यांचेच हाल तर जनावरांचे काय?

वाळूज महानगर : जोगेश्वरी भागातील परदेशवाडी तलावाची स्थिती अतिशय गंभीर व चिंताजनक झाली आहे. विविध विभागांनी दिलेल्या अहवालानुसार तलावातील पाणी सिंचनासाठी पूर्णपणे अयोग्य ठरले. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या तपासणीत तलावाचे पाणी पिण्यासाठी आणि वापरण्यासाठीही अजिबात योग्य नाही, असे निदर्शनास आले. तलावाचे पाणी जेव्हा माणसे पितात तेव्हा त्यांना त्वचा विकार, हृदयाविकार, किडनी, कॅन्सर, डोळे, पोटाचे विकार, मूतखडा आदी गंभीर आजार होऊ शकतात. हे सर्व आजार प्रामुख्याने तलावात सोडल्या जाणाऱ्या रासायनिक आणि केमिकल युक्त पाण्यामुळे होतात. मात्र, या गंभीर बाबीकडे जिल्हा प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ साफ डोळेझाक करत आहे.

या कंपन्यामधून येणाऱ्या रसायनयुक्त पाण्याची तत्काळ विल्हेवाट न लावल्यास संबंधित विभागाच्या कार्यालयाविरुद्ध मोठे जन आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. वाळूज औद्योगिक परिसरातील काही उद्योगांमुळे परिसरात प्रदूषण होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बऱ्याचशा उद्योगामधून निघणारे विषारी रसायनयुक्त पाणी बाजूच्याच परदेशवाडी तलावात सोडले जात असल्याने परिसरातील हजारो हेक्टर जमीन नापीक होण्याच्या मार्गावर आहे. परिसरातील नागरिकांसह शेती, जनवारे, पाण्याचे स्रोत, धोक्यात आले आहेत.

प्रकल्पातील पाणी सिंचनाला वापरल्यामुळे जमिनीतील मातीचे मूलभूत घटकांचेही प्रचंड प्रमाणात अन-बॅलन्सिंग झालेले आहे. एकूण १६ घटक मातीमध्ये असतात ज्याआधारे सुपीकता पातळी निश्चित केल्या जाते. त्यापैकी बहुतांश घटक हे अत्यल्प किंवा अत्यंत जास्त झाले आहेत. अतिशय धक्कादायक गोष्ट म्हणजे एका शेतातील मातीनिरीक्षण, पीक उगवणीस अयोग्य असे, आले आहे.

परदेशवाडी प्रकल्पासाठी अंदाजे १०० हेक्टर जमीन संपादित करण्यात आलेली आहे. १९७२ च्या दुष्काळानंतर परिसरासाठी हा प्रकल्प काही वर्षे वरदान ठरला. या प्रकल्पातील पाण्यावर हजारो हेक्टर जमिनीचे सिंचन होते. या प्रकल्पाजवळील जोगेश्वरी, रामराई, कमळापूर, रांजणगाव गावांची लोकसंख्या एक लाखावर आहे.

आरोग्य विभागाचा अहवालआरोग्य विभागाच्या अहवालानुसार, या तलावातील पाण्यामुळे भयानक आजारांना चालना मिळू शकते. या पाणी नमुना जैविक व रासायनिक तपासणीमध्ये एकूण विरघळलेले घन पदार्थ, निराले, कॅल्शिअम, कोलाइड, क्षारता, एकूण कडकपणा सदरील घटक जास्त प्रमाणात आढळले असून पाणी नमुन्याचा निष्कर्ष पिण्यास व वापरण्याससुद्धा अयोग्य आहे. त्यामुळे त्वचा विकार, हृदयविकार, किडनी विकार, केस गळती, थायरॉइड, कॅन्सर, पोटाचे विकार, किडनी रोग, मूतखडा, डोळ्याचे आजार आदी प्रकारचे रोग यापासून होऊ शकतात.

एमआयडीसी विभागवाळूज औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यामधून सुमारे ५.०० एमएलडी सांडपाणी प्रक्रिया केंद्रामध्ये सोडले जाते. प्रत्येक कारखाना किती सांडपाणी सोडतो, याचे मोजमाप केले जात नाही.

मनुष्यांचेच हाल तर जनावरांचे काय?जर माणसांचे पाणी पिण्यास अयोग्य असेल, तर जनावरांचे काय होईल? तलावातील दूषित पाण्याने जनावरांच्याही आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण झाला.

माती परीक्षणाचा अहवाल भीतीदायकरासायनिक खते व औषधी मोठ्या प्रमाणात वापरल्याशिवाय शेतीत उत्पन्नच येत नाही आणि हा माती परीक्षणाचा अहवाल अत्यंत भीतीदायक आहे. उद्या आम्ही शेतकऱ्यांनी जगायचं कसं, हा प्रश्न निर्माण झाला आहे.- शांतीलाल काबरा, शेतकरी

लवकरच जनआंदोलनमाती व पाण्याचे प्राप्त झालेले अहवाल हे हजारो हेक्टर जमिनीची नापिकी, लाखो लोकांवरती असलेलं गंभीर आजारांचं संकट, अशा भविष्यातील भयावह परिस्थितीचा अंदाज आणणारे आहे. यावर एमआयडीसी, एमपीसीबी, आरोग्य विभाग तसेच सामाजिक भान जपणारे उद्योग यांनी एकत्र येत वेळीच प्रकल्प पुनरुज्जीवन व आवश्यक उपाययोजना करून, भविष्यातील होणारे गंभीर परिणाम टाळता येईल, याकडे लक्ष द्यावे. या गंभीर बाबीला गांभीर्याने न घेतल्यास संबंधित विभागाविरोधात लवकरच जनआंदोलन उभे राहील.- प्रवीण दुबिले, माजी सरपंच

तलावाची बिकट स्थितीमाजी सरपंच प्रवीण दुबिले यांनी कृषी विभाग, आरोग्य विभाग, एमआयडीसी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, सिंचन, भूगर्भ आदी विभागाकडून सदरील तलावातील पाणी, माती, त्यातील सर्व घटकांचे परीक्षण, तपासणी करून अहवाल मागितले. त्यातून तलावाची विद्यमान बिकट स्थिती समोर आली.

एकेकाळी जीवनदायक, आता बनला जीवघेणा !जोगेश्वरी परदेशवाडी तलाव हा एकेकाळी नागरिकांच्या जीवन आधारासाठी महत्त्वपूर्ण स्थळ ठरले होते. येथील पाणी सिंचनासाठी, पिण्यासाठी आणि इतर वापरासाठी लोकांच्या गरजा पूर्ण करायचे. मात्र, आता या तलावाच्या पाण्याने प्रदूषणाचे पातळी इतकी वाढली की ते पिण्यास, सिंचनासाठी किंवा इतर कुठल्याही कारणासाठी अयोग्य बनले आहे. भूगर्भातील पाण्यासह शेतकऱ्यांच्या जमिनी नापिकीच्या दिशेने जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

टॅग्स :Waluj MIDCवाळूज एमआयडीसीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरWaterपाणी