शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

२१ वर्षीय तरुण म्हणाला, ‘डाॅक्टर साहेब, मी मुलगी तर नाही ना?’; लिंगाच्या आकारामुळे काहूर

By संतोष हिरेमठ | Updated: October 14, 2024 12:16 IST

शहरात अनेकांवर शस्त्रक्रियेची वेळ; जननेंद्रीयात जन्मजात दोष, बालपणी पालकांच्या दुर्लक्षा तरुणपणी बनते मोठी समस्या

छत्रपती संभाजीनगर : एक २१ वर्षीय तरुण डाॅक्टरांकडे गेला आणि म्हणाला, ‘डाॅक्टर साहेब, मी मुलगी तर नाही ना ?’ , ‘ मी मुलगा आहे की मुलगी, हे तपासणी करून सांगा’. डाॅक्टरांनी तरुणाशी संवाद साधला. समुपदेशन केले. तरुणाच्या मनात हा प्रश्न का आला? तर केवळ लिंगाचा आकार लहान असल्याच्या भावनेतून त्यांच्या मनात या प्रश्नाने काहूर माजविला. तपासणीअंती ‘तू मुलगाच’ असल्याचा विश्वास डाॅक्टरांनी दिला आणि तरुणाची मानसिक स्थिती पुन्हा सुधारली. परंतु ही स्थिती काही एकाची नाही. यामुळे अनेकजण रुग्णालय गाठत आहेत.

अनेक कारणांमुळे जन्मजात शिशूंमध्ये जननेंद्रीयसंदर्भात आजार उद्भवतात. यात मुलांच्या लिंगासंबंधी अनेक दोष असतात. लहानपणीच या दोषांवर उपचार शक्य आहेत. परंतु अनेक पालक त्याकडे दुर्लक्ष करतात. याचा परिणाम वयात आल्यानंतर मुलांच्या मनावर होतो. त्यातून अनेकजण टोकाचा निर्णय घेत असल्याची स्थिती आहे. त्यामुळे याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले.

किती जणांवर शस्त्रक्रिया?गेल्या काही दिवसांत ४७ मुलांवर शस्त्रक्रिया करून लिंगाला मूळ आकार देण्यात आला, तर चारशेवर मुलांचे समुपदेशन करण्यात आले.

वेळीच उपचार घेणे महत्त्वपूर्णलहान मुलांमध्ये लिंगासंदर्भात काही दोष असेल तर त्याचे निदान वयाच्या १८ महिन्यांपूर्वीच झाले पाहिजे. यासाठी प्रसूतीतज्ज्ञ आणि बालरोगतज्ज्ञ यांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. पालकांनी वेळीच लक्ष दिले पाहिजे. मात्र लाजेमुळे अनेकजण वेळीच लक्ष देत नाहीत. काही प्रश्न निर्माण झाल्यानंतरच उपचारासाठी येतात. परंतु उशिरा आल्यानंतर अनेक अडचणी येतात. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये वेळीच उपचार घेणे सर्वाधिक महत्त्वाचे आहे.- डॉ. आर. जे. तोतला, ज्येष्ठ पेडियाट्रिक सर्जन आणि पेडियाट्रिक यूरोलॉजिस्ट

हा आजार नाही, धैर्याने सामोरे जाहा काही आजार नाही, तर संप्रेरकाची कमतरता, जीन्समध्ये बदल आदींमुळे होते. त्याला धैर्याने सामोरे गेले पाहिजे. पालकांनी वेळीच लक्ष द्यावे. लहानपणीच उपचार करणे सोपे असते. समुपदेशन आणि उपचाराने त्यावर सकारात्मक बदल करता येतो.- डाॅ. संदीप हंबर्डे, पेडियाट्रिक सर्जन, पेडियाट्रिक यूरोलाॅजिस्ट

वर्तणुकीकडे लक्ष द्यावेपालकांनी मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष दिले पाहिजे. लिंगासंदर्भात काही दोष असेल तर त्याचा मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होणार नाही, याची काळजी घ्यावी. लवकर निदान, लवकर उपचार घेणे महत्त्वाचे ठरते.- डॉ. व्यंकट गिते, मूत्रशल्यचिकित्साशास्त्र विभागप्रमुख, सुपर स्पेशालिटी हाॅस्पिटल, घाटी

टॅग्स :Healthआरोग्यAurangabadऔरंगाबाद