'तुम्हाला राजकारणासाठी औरंगजेब हवाय, म्हणून त्याला...'; संजय राऊतांचा सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 20:28 IST2023-06-08T20:18:24+5:302023-06-08T20:28:12+5:30

राज्यातील मंत्र्यांची भ्रष्टाचार प्रकरण हळूहळू बाहेर काढतोय. त्यांच्यावर कारवाई करावी लागेल, असा दावा संजय राऊतांनी केला.

Thackeray group MP Sanjay Raut has criticized the state government. | 'तुम्हाला राजकारणासाठी औरंगजेब हवाय, म्हणून त्याला...'; संजय राऊतांचा सरकारवर निशाणा

'तुम्हाला राजकारणासाठी औरंगजेब हवाय, म्हणून त्याला...'; संजय राऊतांचा सरकारवर निशाणा

शिवसेना शाखा स्थापनेच्या ३९ वा वर्धापनदिनानिमित्त आयोजित पक्षाच्या मेळाव्यासाठी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. जे आतापर्यंत शिवसेना पक्ष सोडून गेले ते पुन्हा परत दिसले नाही, असं संजय राऊत म्हणाले. 

अनेकांनी उमेदीच्या काळात पक्ष सोडला आणि गेले. मात्र आता त्यांचे नामोनिशाण दिसत नाही. आम्ही तरुण असल्यापासून पाहतो. आमचे आयुष्य शिवसेनेत गेले. अनेक प्रसंग पाहिले. एक वेळ अशी होती की सगळे जनता पक्षात जात होते. सगळे पक्ष संपतील असे वाटत होते. त्यावेळी शिवसेना पक्ष विलीन करा, असं म्हटलं जात होते. त्यावेळी मी रक्त सांडून पक्ष उभा केला. ज्यांना जायचं त्यांनी जावं. चार जण घेऊन पुढे जाईल असं म्हणत बाळासाहेबांनी शिवसेना हा पक्ष संकटकाळी बाहेर काढला होता, अशी आठवण संजय राऊतांनी सांगितली. 

संविधान भ्रष्ट असू शकत नाही. कितीही जेलमध्ये टाकू द्या, मी घाबरलो नाही. राज्यातील मंत्र्यांची भ्रष्टाचार प्रकरण हळूहळू बाहेर काढतोय. त्यांच्यावर कारवाई करावी लागेल, असा दावा संजय राऊतांनी केला. तसेच तुम्हाला कोण वाचणार?, तुमचे सरकार तर जाणार, यांची यादी तयार ठेवा, कोणाला कुठे पाठवायचे ते ठरवून ठेवा जाहीरपणे सांगतोय, असा इशारा संजय राऊतांनी दिला. राज्यात दंगल कोण घडवतो. औरंगजेबाला गाडले कुठे आणि जिवंत कुठे करत आहात. तुम्हाला राजकारणासाठी औरंगजेब हवा आहे, म्हणून त्याला बाहेर काढले जात आहे. तुमचं हिंदुत्व खानांवर अवलंबून आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारा, अब्दुल सत्तार त्यांचे हिंदुत्वाचे प्रचारक आहेत. लवकरच ते आरएसएसचे देखील प्रचारक होतील, सांगता येत नाही, अशी टीका संजय राऊतांनी केली. 

देवेंद्र फडणवीस सर्वात कमोजर गृहमंत्री- राऊत

राज्य सरकारवर टांगती तलवार असतानाही सत्तेवर बसलेले आहात. हे सरकार तीन महिन्यात जाणार आहे. राजकारणासाठी तुम्हाला औरंगजेब लागतो. तुम्ही दंगली घडवतात.  देवेंद्र फडणवीस यांचे गृहखाते फेल आहे. गुंडांच्या मुसक्या आवळण्याऐवजी विरोधकांना त्रास देण्यासाठी गृहखात्याचा वापर केला जात आहे.  कमजोर गृहमंत्री म्हणून इतिहासात त्यांची नोंद राहिल अशी टीका राऊत यांनी केली.

Web Title: Thackeray group MP Sanjay Raut has criticized the state government.