तरुणाच्या गळ्यातल्या रुमालावरून तणाव, कटकट गेट परिसरात पोलिसांच्या सतर्कतेने शांतता

By सुमित डोळे | Updated: December 27, 2023 12:47 IST2023-12-27T12:42:06+5:302023-12-27T12:47:00+5:30

तरुणीसोबत असलेल्या तरुणाच्या गळ्यातील रुमालावरून स्थानिक तरुणांनी आक्षेप घेतला. तरुणीने त्यांना विरोध करताच जमावाने दोघांवर हात उचलला.

Tension from the handkerchief around the young man's neck, peace in Katkat gate area with police vigilance | तरुणाच्या गळ्यातल्या रुमालावरून तणाव, कटकट गेट परिसरात पोलिसांच्या सतर्कतेने शांतता

तरुणाच्या गळ्यातल्या रुमालावरून तणाव, कटकट गेट परिसरात पोलिसांच्या सतर्कतेने शांतता

छत्रपती संभाजीनगर : ठेकेदार मालकाच्या मुलीसोबत जेवणाचे पार्सल घेण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या गळ्यातील रुमालावरून वाद होऊन कटकट गेट भागात मंगळवारी रात्री अकरा वाजता तणाव निर्माण झाला. दोघांवर जमाव चालून गेल्याने हॉटेल चालकाने तरुण, तरुणीला हॉटेलमध्ये घेऊन शटर लावल्यानंतर बाहेर शेकडोंचा जमाव जमला. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी धाव घेतली. पोलिसांनी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास जमाव पांगवल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री एक तरुण व डॉक्टर तरुणी कटकट गेट भागातील हॉटेलमध्ये जेवणाचे पार्सल घेण्यासाठी गेले. तरुणीसोबत असलेल्या तरुणाच्या गळ्यातील रुमालावरून स्थानिक तरुणांनी आक्षेप घेतला. तरुणीने त्यांना विरोध करताच जमावाने दोघांवर हात उचलला. जमाव प्रक्षोभक होत असल्याचे लक्षात येताच हॉटेलचालकाने तरुण-तरुणीला हॉटेलच्या आत घेत शटर लावून घेतले व पोलिसांना कळवले. मात्र यामुळे काही मिनिटांतच हॉटेलच्या बाहेर जमाव जमला.

घटनेची माहिती कळताच पोलिस उपायुक्त नवनीत कॉवत यांच्यासह सर्व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जमावाला निघून जाण्याचे आवाहन करण्यात आले. हॉटेलमध्ये थांबलेल्या तरुण-तरुणीला पोलिसांच्या वाहनातून दुसऱ्या पोलिस ठाण्यामध्ये सुरक्षित नेण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी जमाव पांगवला. सदर तरुण हा झारखंडचा असून मिसारवाडीतील एका ठेकेदाराकडे काम करतो. ठेकेदाराची मुलगी ही डॉक्टर असून एका रुग्णालयात काम करते.

Web Title: Tension from the handkerchief around the young man's neck, peace in Katkat gate area with police vigilance