वेरूळ घाटात बसला टेम्पोची धडक; चालकाच्या प्रसंगावधानाने ४० प्रवासी बचावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 15:55 IST2024-08-08T15:51:56+5:302024-08-08T15:55:19+5:30
बसला धडक दिल्यानंतर टेम्पो चालक अपघातस्थळावरून पसार झाला आहे.

वेरूळ घाटात बसला टेम्पोची धडक; चालकाच्या प्रसंगावधानाने ४० प्रवासी बचावले
- सुनील घोडके
खुलताबाद : छत्रपती संभाजीनगरहून धुळ्याला जाणाऱ्या बसला समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने आज दुपारी २ वाजेच्या सुमारास जोरदार धडक दिली. यावेळी बस संरक्षण भिंतीवर चढली, पंरतू चालकाच्या प्रसंगावधानतेमुळे बस खोल दरीत कोसळण्यापासून बचावली. यामुळे मोठा अपघात टळून बसमधील ४० प्रवाशांचा जीव बांलबाल बचावला.
छत्रपती संभाजीनगर ते धुळे बस ( क्रमांक एम एच १५ जेसी ४६६० ) ही ४० प्रवाशी घेवून आज दुपारी २ वाजेच्या सुमारास वेरूळ घाटातून जात होती. यावेळी समोरून भरधाव वेगात येणाऱ्या टेम्पोने बसला समोरून जोरदार धडक दिली. जोरदार धडकमुळे बस वेरूळ घाटातील संरक्षण भिंतीवर चढत पुढे होती. मात्र, बसचालकाने मोठ्या खुबीने बसवर नियंत्रण मिळवले. यामुळे बस खोल दरीत जाण्यापासून वाचली आणि ४० प्रवाशांचे प्राण बालंबाल बचावले. या अपघातात कोणालाही इजा झाली नाही.
दरम्यान, बसला धडक दिल्यानंतर टेम्पो चालक अपघातस्थळावरून फरार झाला. माहिती मिळताच खुलताबाद पोलीस अपघातस्थळी दाखल झाले आहेत. बसमधील प्रवाशांना चालक व वाहकानी दुस-या बसमध्ये बसून दिले आहेत. या अपघातात वेरूळ घाटात काहीवेळ वाहतुकीची कोंडी झाली होती. पोलीस कर्मचारी प्रमोद साळवी, राहुल दांडगे यांनी वाहतूक सुरळीत केली.