शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनामुळेच करवसुली घटली

By admin | Updated: January 23, 2015 00:57 IST

औरंगाबाद : नागरिक कर भरण्यास तयार आहेत; परंतु प्रशासन त्यांची अडचण समजून घेऊन त्यावर तोडगा काढत नाही. जे कर देतात, त्यांच्याच अडचणी वाढविण्यात प्रशासनाला रस आहे

औरंगाबाद : नागरिक कर भरण्यास तयार आहेत; परंतु प्रशासन त्यांची अडचण समजून घेऊन त्यावर तोडगा काढत नाही. जे कर देतात, त्यांच्याच अडचणी वाढविण्यात प्रशासनाला रस आहे. कर आकारणीसाठी नव्या मालमत्ता शोधल्या जात नाहीत. त्यामुळे शहराची कर मागणी वाढत नाही, असा आरोपांचा भडिमार गुरुवारी झालेल्या मनपाच्या स्थायी समिती बैठकीत सदस्यांनी केला. आर्थिक वर्ष संपण्यास फक्त दोन महिन्यांचा अवधी शिल्लक असताना महापालिकेची कर वसुली वाढावी, यावर नगरसेवकांनी स्थायी समितीच्या बैठकीत गुरुवारी गरमागरम चर्चा घडवून आणली. कर वसुली व कर मागणी वाढीसाठी अनेक सूचना केल्या. तीन महिन्यांवर आलेल्या मनपाच्या निवडणुकीवर लक्ष ठेवून ही वसुली सर्वसामान्य नागरिकांकडून सक्तीने करण्यापेक्षा व्यावसायिक प्रतिष्ठानांना ‘लक्ष्य’ करा, असेही सांगितले. सभापती विजय वाघचौरे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीच्या बैठकीला प्रारंभ होताच, नगरसेवक सुरेंद्र कुलकर्णी यांनी कर वसुलीच्या मुद्याला हात घातला. त्र्यंबक तुपे, प्रीती तोतला, मीर हिदायत अली आदींनी प्रशासनाला लक्ष्य करून नागरिक कर भरणा करण्यासाठी येत असताना प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ते कर भरण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप केला. फक्त ३२ टक्के वसुलीकर वसुली अधिक प्रमाणात व्हावी यासाठी प्रशासनाने उचललेल्या पावलांची माहिती शिवाजी झनझन यांनी दिली. ते म्हणाले, १ लाखांवरील कर वसुली उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे, ५० हजार ते १ लाखांपर्यंतचे अधिकार कार्यकारी अभियंत्याकडे, ५० हजार ते १० हजारांपर्यंत वॉर्ड अभियंते व १० हजारांखालील वसुली वॉर्ड अधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे. याशिवाय चुकीची दिलेली कर मागणी बिले दुरुस्त करणे व नव्या मालमत्तांना कर आकारणीखाली आणण्याचे कामही सुरू आहे. गेल्या दहा महिन्यांत ३२ टक्के कर वसुली झाली असून, पुढील दोन महिन्यांत एकूण उद्दिष्टाच्या ६० ते ७० टक्के वसुली होईल. मोठे कर थकबाकीदारव्यापारी व व्यावसायिक प्रतिष्ठानांकडून कर वसुलीसाठी अधिक प्रयत्न केले जात आहेत, असे सांगून झनझन म्हणाले, कृषी उत्पन्न बाजार समितीकडे ६ कोटी २९ लाख रुपयांची थकबाकी आहे.फौजी ढाब्याकडून आतापर्यंत वर्षाला फक्त ४५०० रुपये कर आकारला जात होता. त्याची नव्याने आकारणी करून ३ लाख रुपये वसुली करण्यात आली. विमानतळ, रेल्वे, फॉरेस्ट ही सरकारी कार्यालये कर देण्यास आतापर्यंत तयारच होत नव्हती; परंतु आता ते ५० टक्के कर देण्यास तयार झाले आहेत. ४गुलमंडी वॉर्डात शहरातील सर्वाधिक व्यापारी असताना कर वसुली कमी कशी, असा प्रश्न नगरसेविका प्रीती तोतला यांनी उपस्थित केला आणि म्हणाल्या येथे वसुलीसाठी कर्मचारीच नाहीत, तर वसुली होणार कशी? या प्रभागात लवकर कर्मचारी उपलब्ध करून द्या. महापालिकेचे कर्तेकरविते नेतृत्व याच परिसरात राहते, त्यामुळे तर वसुली कमी नाही ना, अशी खुसफूस नंतर सदस्यांत सुरू झाली व त्यावरून सभागृहात हंशाही पिकला.