‘टाटा’ ने केला टाटा ! जागा पाहिली औरंगाबादेत अन् गुंतवणूक केली नवी मुंबईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2021 12:42 PM2021-12-20T12:42:39+5:302021-12-20T12:45:54+5:30

Auric City in Aurangabad : आणखी एका बड्या समूहाची औरंगाबादकडे पाठ

‘Tata’ group is not interested in Auric city of DMIC ! saw the place in Aurangabad and invested in Navi Mumbai | ‘टाटा’ ने केला टाटा ! जागा पाहिली औरंगाबादेत अन् गुंतवणूक केली नवी मुंबईत

‘टाटा’ ने केला टाटा ! जागा पाहिली औरंगाबादेत अन् गुंतवणूक केली नवी मुंबईत

googlenewsNext

- विकास राऊत
औरंगाबाद : किया मोटार्स काॅर्पोरेशनने जानेवारी २०१७मध्ये डीएमआयसीतील ( DMIC) ‘ऑरिक’मध्ये ( Auric City ) येण्याऐवजी आंध्र प्रदेशला पसंती दिली. त्यानंतर ऑरिकमध्ये मोठा प्रकल्प येण्याच्या नुसत्याच चर्चा आणि घोषणा झाल्या. जानेवारी २०२० मध्ये टाटा ( Tata Group ) ऑरिकमध्ये ‘आयटी’ गुंतवणुकीसाठी ‘टाटा’ सकारात्मक असल्याचा दावा करण्यात आला. मात्र ‘टाटा’नेही औरंगाबादला टाटा करत नव्या मुंबईत ५ हजार कोटींची गुंतवणूक केली (‘Tata’ group is not interested to invest in Auric city of DMIC Aurangabad ).

दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर अंतर्गत विकसित करण्यात येत असलेल्या ऑरिक सिटीमध्ये माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील (आयटी) उद्योगांच्या गुंतवणुकीसाठी प्राधान्याने प्रयत्न होत असले, तरी गुंतवणूक मात्र दुसरीकडे जात आहे. टाटा समूहाचे तन्मय चक्रवर्ती आणि आफ्रिकेसह विविध देशातील गुंतवणूकदार प्रकाश जैन यांनी ऑरिकमधील पायाभूत सुविधांची पाहणी २०२०मध्ये केली. त्यांनी गुंतवणूक करण्यास सकारात्मकता दर्शविल्याचा दावा त्यावेळी करण्यात आला. परंतु, ती गुंतवणूक प्रत्यक्षात उतरली नाही. त्यानंतर राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनीही ऑरिक सिटी परिसराची पाहणी करत गुुंतवणुकीला वाव असल्याचे स्पष्ट केले होते. आता रशियन एनएलएमके ही कंपनी येणार असल्याचे दीड वर्षांपासून सांगितले जात आहे. मागील तीन वर्षांत फक्त ह्योसंग या कंपनीने गुंतवणूक केली आहे.

हे उद्योग आलेच नाहीत
मागील काही वर्षांत महिंद्रा, फोक्सवॅगन, नेस्ले, हिरो, होंडा, फोर्ड, एलजी, एसएआयसी, मारुती सुझुकीनंतर किया मोटार्सदेखील येणार-येणार म्हणून चर्चाच झाली. या कंपन्यांची गुंतवणूक होणार असल्याबाबत बातम्याच आजवर येत राहिल्या, परंतु हे उद्योग दुसरीकडेच गुंतवणुकीसाठी सरसावले. आयटी कंपन्यांची गुंतवणूक औरंगाबादेतील डीएमआयसीमध्ये होण्याबाबत दोन वर्षांपासून घोषणा होत आहेत, परंतु अद्याप हाती काहीही लागलेले नाही.

काय आहे डीएमआयसीत ?
शेंद्रा आणि बिडकीनमध्ये सुमारे १० हजार एकर जमीन उपलब्ध आहे. शासनाने एवढ्या मोठ्या भूसंपादनासाठी ३ हजार कोटी रुपये गुंतविले आहेत. शिवाय ऑरिक सिटीच्या प्रशासकीय हॉल व इतर सुविधा दिल्या आहेत. बिडकीनमध्ये १,३९० कोटींच्या पायाभूत सुविधा दिल्या आहेत. शेंद्रा-ऑरिकमध्ये सुमारे १ हजार कोटींची गुंतवणूक करत सुविधा दिल्या आहेत. एनएलएमके ही रशियन कंपनी शेंद्रा-बिडकीन इंडस्ट्रीयल पार्कमध्ये गुंतवणूक करणार असल्याचे दीड वर्षांपासून सांगण्यात येत आहे.

काय आहे टाटांच्या इंटेलियन पार्कमध्ये?
पाच हजार कोटींची थेट गुंतवणूक आणि सुमारे सत्तर हजार जणांना रोजगार देणाऱ्या टाटा रिॲलिटीच्या 'इंटेलियन' आयटी पार्कचे भूमिपूजन शनिवारी झाले. नवी मुंबईत सुमारे ४७.१ एकर क्षेत्रावर इंटेलियन पार्क उभारले जाणार आहे. या ठिकाणी आयटी, व्यापारी केंद्र, डेटा सेंटर विकास केंद्र असेल. नवी मुंबईतील घणसोली स्टेशनसमोर हे इंटेलियन पार्क असेल. सुमारे ४७.१ एकर व सत्तर हजार चौरस फुटांपेक्षा अधिक जागेवर हे पार्क असेल. यामुळे नवी मुंबई परिसराचा कायापालट होणार आहे.

Web Title: ‘Tata’ group is not interested in Auric city of DMIC ! saw the place in Aurangabad and invested in Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.