शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

शहराध्यक्षपदाच्या शर्यतीत तनवाणींची उडी

By admin | Updated: December 27, 2015 00:26 IST

औरंगाबाद : भाजपचे शहराध्यक्षपद मिळविण्यासाठी अनेकांनी मोर्चेबांधणी सुरू केलेली असताना आता या पदाच्या शर्यतीत माजी आमदार किशनचंद तनवाणी यांनीही उडी घेतली आहे

औरंगाबाद : भाजपचे शहराध्यक्षपद मिळविण्यासाठी अनेकांनी मोर्चेबांधणी सुरू केलेली असताना आता या पदाच्या शर्यतीत माजी आमदार किशनचंद तनवाणी यांनीही उडी घेतली आहे. तनवाणी यांनीच प्रदेशाध्यक्षांकडे तशी इच्छा व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे शहराध्यक्षपदासाठीची चुरस वाढणार आहे. विद्यमान शहराध्यक्षांची मुदत संपत आली आहे. त्यामुळे पक्षात नवीन शहराध्यक्ष निवडीच्या हालचालींना वेग आला आहे. शहराध्यक्षांच्या निवडीआधी शहरातील वॉर्ड समित्या आणि मंडळ समित्यांच्या निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. ३० डिसेंबरपर्यंत वॉर्ड समित्यांची आणि १५ जानेवारीपर्यंत मंडळ समित्यांची निवड पूर्ण होणार आहे. त्यानंतर १६ जानेवारी ते २५ जानेवारीदरम्यान शहराध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पडणार आहे. हे पद मिळविण्यासाठी पक्षातील अनेकांनी लॉबिंग सुरू केली आहे. सद्य:स्थितीत पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य अनिल मकरिये, शहर सरचिटणीस विजय साळवे, माजी महापौर संजय जोशी आदींची नावे या पदासाठी चर्चेत आहेत; परंतु आता हे पद मिळविण्यासाठी माजी आमदार किशनचंद तनवाणी यांनीही प्रयत्न चालविले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपत आलेल्या तनवाणी यांनी मध्य विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविलेली आहे; परंतु त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्याआधी त्यांनी शिवसेनेत आमदार, महापौर अशी मोठी पदे भूषविलेली आहेत. सध्या त्यांच्याकडे कोणतेच पद नसल्यामुळे अधिकाराचे पद मिळविण्याचा तनवाणी यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी त्यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना गळ घातल्याचे समजते. दुसरीकडे अनिल मकरिये यांचीही स्थानिक आमदाराच्या माध्यमातून लॉबिंग सुरू आहे. याशिवाय संजय जोशी, विजय साळवे यांच्यासह पक्षातील इतरही काही जण शहराध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे शहराध्यक्षपदाच्या निवडीची चुरस वाढणार आहे. भाजपने शहरातील सर्व वॉर्ड समित्यांच्या निवडीची प्रक्रिया पंधरा दिवसांपासून सुरू केली आहे. वॉर्ड समित्यांची निवड अंतिम टप्प्यात असून ती दोन दिवसांत पूर्ण होणार असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले. त्यानंतर लगेचच मंडळ समित्यांची निवड होणार आहे. शहरात एकूण ९ मंडळे असून त्यांच्या समिती सदस्यांची निवड होणार आहे.