शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

टँकरचालक गल्लीबोळातही बेदरकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 22:01 IST

पाणीटंचाई वाढल्याने टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी कमी वेळेत जास्त फेऱ्या मारण्याच्या प्रयत्नात गल्लीबोळात बेदरकार वाहने पळविली जात आहेत. चालकावर कुणाचाही अंकुश दिसत नाही. परिणामी, किरकोळ आणि गंभीर स्वरूपाचे अपघात सतत होत आहेत.

ठळक मुद्देधावता राक्षस : सातारा, मिसारवाडी, चिकलठाणा, गारखेडा, पडेगाव, हर्सूल, सिडको भागात सतत भीती

औरंगाबाद : पाणीटंचाई वाढल्याने टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी कमी वेळेत जास्त फेऱ्या मारण्याच्या प्रयत्नात गल्लीबोळात बेदरकार वाहने पळविली जात आहेत. चालकावर कुणाचाही अंकुश दिसत नाही. परिणामी, किरकोळ आणि गंभीर स्वरूपाचे अपघात सतत होत आहेत.सातारा, चिकलठाणा, गारखेडा, पडेगाव, सिडको, हर्सूल, नक्षत्रवाडीसह परिसरात टँकरच्या फेºया सतत सुरू आहेत. ५ हजार तसेच २ हजार लिटरच्या पाणी टँकरची मोठी मागणी आहे. वेळेच्या आत पाण्याच्या खेपा टाकण्याचा टँकरचालकाचा प्रयत्न असतो, टँकर रिकामे केल्यानंतर ते पुन्हा भरण्यासाठी घाई करावी लागते. या प्रयत्नात दररोज किरकोळ अपघाताचे प्रकारही वाढले आहेत. गल्लीबोळात मोठ्या क्षमतेचे टँकर फिरू शकत नसल्याने २ हजार लिटरचे टँकर वाढले आहेत. मनपाकडे पाणी भरण्यासाठी येणाºया टँकरची रजिस्टरवर नोंद आहे; परंतु खाजगी टँकरचे पिकअप पॉइंट विविध ठिकाणी असल्याने त्याचा आकडा कुठेही दिसत नाही. प्रामुख्याने कोणतेही वाहन घेतल्यास त्याची नोंद आरटीओ कार्यालयात करावीच लागते, त्या वाहनाचा उपयोग काय आणि ते कोणत्या कामासाठी वापरले जाणार आहे. त्यानुसार रीतसर पासिंग केली जाते; परंतु पाचशेपेक्षा अधिक छोटे-मोठे टँकर शहर व परिसरात फिरत असून, त्यांच्याकडे आरटीओ कार्यालयाचा वाहतूक परवानाच असल्याचे समजते; परंतु ते कमर्शियल पाणीपुरवठा करणार आहे, अशी नोंद केल्याचे तुरळक सापडतात.मनपाची नव्हे आरटीओची जबाबदारीमनपाकडे पाणी भरणाºया टँकरपैकी किती वाहनांना रीतसर टँकरचा परवाना आहे, याविषयी खात्रीलायक उत्तर मनपाच्या अधिकाºयाकडे देखील मिळत नाही. भाडेतत्त्वावर ते पाणी भरून नेतात त्याविषयी नोंद घेतल्याचे जाणवत नाही. ती जबाबदारी आरटीओ कार्यालयाची असल्याचे सूत्राकडून समजते. मनपाकडे १०६ टँकरपाणीपुरवठा करण्यासाठी मनपाकडे रीतसर १०६ टँकरचीच नोंद असून, ते अधिकृत आहेत. ते दिवसभरात सहाशेपेक्षा अधिक फेºया मारतात; परंतु खाजगी मालकीच्या टँकरची संख्या १,२५० च्या आसपास गणली जाते. त्यांची अधिकृत कुठेही नोंद नाही. विविध सेंटरवर पाणी भरण्यासाठी येणाºया टँकरवर ‘मनपाचा पाणीपुरवठा’, असे लिहिलेले असते, ते पाणी बिनधास्त विकताना दिसत आहेत. पाणीटंचाईमुळे कमाईचे साधन म्हणून पाणी विकण्याचा सोपा धंदा अनेकांनी सुरू केला आहे. टँकरसाठी आरटीओ कार्यालयाकडून लागणारे नियम त्यांनी धाब्यावर बसविलेले आहेत. टँकरची रीतसर तपासणी करण्याचे संकेतही आरटीओकडून मिळाले असून, मनपाचे अधिकारीदेखील टँकर लॉबीच्या दबावामुळे ‘ब्र’शब्द बोलू शकत नाहीत, असे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणी