शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

तेलगावात फुटला आश्रूंचा बांध !

By admin | Updated: May 27, 2015 00:41 IST

बीड : वंचित, उपेक्षित घटकांसाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घालणाऱ्या अ‍ॅड. एकनाथराव आवाड यांना जड अंत:करणाने मंगळवारी तेलगाव (ता. धारुर) येथे हजारोंच्या उपस्थितीत अखेरचा निरोप देण्यात आला

बीड : वंचित, उपेक्षित घटकांसाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घालणाऱ्या अ‍ॅड. एकनाथराव आवाड यांना जड अंत:करणाने मंगळवारी तेलगाव (ता. धारुर) येथे हजारोंच्या उपस्थितीत अखेरचा निरोप देण्यात आला. अमर रहे... अमर रहे... अशा घोषणा देत कार्यकर्ते एकमेकांच्या गळ्यात पडून रडत होते.मानवी हक्क अभियानच्या माध्यमातून सामान्यांचा स्वाभिमान जागवत त्यांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी अ‍ॅड. आवाड यांनी शेवटपर्यंत संघर्ष केला. ५० हजार कुटुंबियांना त्यांनी गायरान मिळवून देत हक्काची लढाई लढली होती. एकनाथराव आवाड यांच्या अंत्यसंस्कारासाठी तेलगावात मोठी गर्दी झाली होती. घरातील व्यक्तीचा मृत्यू झाल्याची भावना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होती. नेल्सन मंडेला वसाहतीत आवाड यांचे पार्थिव अंत्यदर्शनाकरता ठेवले होते. यावेळी अंतिम दर्शनासाठी लांबलचक रांगा लावाव्या लागल्या. सकाळी ११ वाजता अंत्ययात्रा निघाली. या यात्रेत हजारोंच्या संख्येने महिला, पुरुष सहभागी होते. आवाड यांनी महिलांच्या स्वावलंबनासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले. अनेक पीडितांना आधार दिला. अशा हजारो महिला हुंदके देत, आश्रू गाळत होत्या. अंत्ययात्रेत महिलांनीच पार्थिवाला खांदा दिला. बौद्धधम्मानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटुंबियांनी आवाड यांच्या पार्थिवास अग्नीडाग दिला. वाहतूक दीड तास ठप्पअ‍ॅड. आवाड यांच्या अंत्यसंस्कारासाठी जिल्ह्यासह राज्यभरातून नेते, कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील मंडळी आली होती. अंत्यसंस्कार आटोपल्यावर तेलगाव चौकापासून ते नेल्सन मंडेला वसाहत व वसाहत ते माजलगाव रस्त्यावर प्रचंड गर्दी होती. वाहने, पादचारी एकाचवेळी रस्त्यावर आल्याने दीड तास वाहतूक ठप्प झाली. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली. पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रा. आ. जोगेंद्र कवाडे म्हणाले, एकनाथरावांनी अनेक वर्षे संघर्ष केला. चळवळीतील खंबीर व धाडसी नेते संपत आहेत, ही चिंतेची बाब असल्याचे नमूद करुन आवाड यांच्यासोबतच्या आठवणी त्यांनी ताज्या केल्या.अनेक आंदोलनात सोबत होतो, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांना आ़श्रू अनावर झाले.रिपाइं नेते गौतम भालेराव म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची पेरणी त्यांनी मातंग समाजात केली होती. आंबेडकरी चळवळीतील बहुआयामी नेता म्हणून त्यांना ओळखले जायचे. त्यांच्या निधनाने झालेली पोकळी भरुन न येणारी आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी एकनाथराव आवाड यांनी आयुष्यभर शोषित, पीडितांची बाजू लावून धरल्याचे सांगितले. सामान्यांना उन्हातून सावलीत आणणारा हा नेता अचानक सोडून गेल्याने धक्का बसल्याचे ते म्हणाले.आ. विवेक पंडित, आ. जयदेव गायकवाड, बहुजन विकास मोर्चाचे बाबूराव पोटभरे, कॉ. विठ्ठल मोरे, लक्ष्मण माने, जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित, माजी आ. राधाकृष्ण होके पाटील, पप्पू कागदे, अजिंक्य चांदणे यांनी देखील एकनाथराव आवाड यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्यकतृत्वाचा आढावा घेतला. एकनाथराव आवाड हे चळवळीतील रखरखता निखारा होते, त्यांच्या जाण्याने चळवळीने मोठा उर्जास्त्रोत गमावल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. (प्रतिनिधी)