औरंगाबाद शहरातून मोबाईलवर बोलत चालक ‘सुसाट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 00:09 IST2018-04-29T00:08:10+5:302018-04-29T00:09:37+5:30
शहरातील रस्त्यांवर मोबाईलवर बोलत चालकांकडून ‘सुसाट’ वाहन पळविण्याचे प्रकार होत आहेत. दुचाकी, चारचाकींबरोबर ‘एसटी’ आणि रिक्षाचालकांकडून हे धोकादायक प्रकार होत आहेत. या प्रकाराने वाहनातील प्रवाशांबरोबर रस्त्यावरील अन्य वाहनचालक, पादचाऱ्यांचा जीव धोक्यात येत आहे.

औरंगाबाद शहरातून मोबाईलवर बोलत चालक ‘सुसाट’
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरातील रस्त्यांवर मोबाईलवर बोलत चालकांकडून ‘सुसाट’ वाहन पळविण्याचे प्रकार होत आहेत. दुचाकी, चारचाकींबरोबर ‘एसटी’ आणि रिक्षाचालकांकडून हे धोकादायक प्रकार होत आहेत. या प्रकाराने वाहनातील प्रवाशांबरोबर रस्त्यावरील अन्य वाहनचालक, पादचाऱ्यांचा जीव धोक्यात येत आहे. त्यामुळे अशा वाहनचालकांना कोण रोखणार? असा सवाल सर्वसामान्यांतून होत आहे.
गोरखपूरपासून ५० किमी अंतरावरील कुशीनगरजवळ शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस रेल्वेवर आदळल्याने १३ मुले व बसचालक असे १४ जण मृत्युमुखी पडले. बस चालविताना चालकाने गाणी ऐकण्यासाठी हेडफोन लावला होता. त्यातूनच हा दुर्दैवी अपघात घडला. शहरात एकीकडे रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे, तर दुसरीकडे शहरातील रस्त्यावर मोबाईलवर बोलत, हेडफोन लावून वाहन चालविण्याचे प्रकार सर्रास होत आहेत. वाहन चालविताना एखाद्याचा मोबाईलवर कॉल आला, तर चालक एका हाताने दुचाकीचे हॅण्डल, चारचाकीचे स्टेअरिंग आणि दुसºया हातात मोबाईल धरून वाहन चालविण्याची कसरत करतात. यामुळे रस्त्यावरून नजर हटते. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यास अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
दुचाकी, चारचाकींबरोबर बस, रिक्षाचालकही मोबाईलवर बोलत असल्याने प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात येत आहे. एसटी महामंडळाने बसचालकांना कर्तव्यावर असताना मोबाईल वापरण्यावर बंदी घातली आहे. सुरक्षित प्रवास म्हणून ‘एसटी’ची ओळख आहे. त्यामुळे एसटीने प्रवास करणाºयांची संख्या मोठी आहे. मात्र, अनेक बसचालक बिनधास्तपणे प्रवासात मोबाईलवर बोलतात. मोबाईल प्रवाशांसाठी काळ ठरू शकतो, अशी भीती व्यक्त होते.
संयुक्तपणे मोहीम
आरटीओ कार्यालयाच्या पथकाकडून मोबाईलवर बोलणाºया चालकांवर नियमितपणे कारवाई केली जाते. त्यांना नोटीस दिल्या जातात. शहरात वाहतूक पोलीस आणि आरटीओ कार्यालय यांच्या संयुक्तपणे मोहीम राबवून मोबाईलवर बोलणाºया चालकांवर कारवाई केली जाईल.
-संजय मेत्रेवार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
बेशिस्त खपवून घेणार नाही
मोबाईलवर बोलत बस चालविणाºया पैठण आगाराच्या चालकास नुकतेच निलंबित करून मराठवाड्याबाहेर बदली के ली. मोबाईलवर बोलत बस चालविण्याची बेशिस्त खपवून घेणार नाही. अशा चालकांवर कारवाई केली जाईल.
-प्रशांत भुसारी, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ