मुख्यालयी उपस्थित नसलेला केळगावचा तलाठी निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 19:58 IST2019-05-15T19:54:37+5:302019-05-15T19:58:49+5:30
मागील आठवड्यात विभागीय आयुक्तांचा दौरा असतानाही ते गैरहजर होते.

मुख्यालयी उपस्थित नसलेला केळगावचा तलाठी निलंबित
सिल्लोड (औरंगाबाद ) : दुष्काळ निवारण, निवडणूक कामात हलगर्जी पणा केल्याने व मुख्यालयी हजर न राहिल्याने केळगाव येथील तलाठ्यास उपविभागीय अधिकाऱ्यांनी बुधवारी निलंबीत केले. निलंबित करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव एस. सी. दांडगे असे आहे.
सध्या तालुक्यात भीषण पाणी टंचाई आहे. केळगाव मध्यम प्रकल्पातुन संपूर्ण तालुक्यात टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. यामुळे तलाठ्यांना मुख्यालयी थांबण्याचे आदेश होते. परंतु वारंवार सूचना देऊनही तलाठी दांडगे गैरहजर राहत होते. मागील आठवड्यात विभागीय आयुक्तांचा दौरा असतानाही ते गैरहजर होते. तसेच टंचाई काळात महसूल विभागाने बोलावलेल्या बैठकीलाही ते गैरहजर होते. याशिवाय लोकसभा निवडणूक कामात त्यांनी हलगर्जीपणा केला. तसेच याबाबत लेखी खुलासा मागितला असता तो ही दिला नाही. यामुळे तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्या अहवालावरून उपविभागीय अधिकारी पांडुरंग कुलकर्णी यांनी दांडगे यांच्यावर निलंबनाची कार्यवाही केली.