लाच घेताना तलाठी गजाआड
By Admin | Updated: May 8, 2014 23:20 IST2014-05-08T23:19:08+5:302014-05-08T23:20:35+5:30
लातूर : सय्यदपूर येथील येथील एका शेतकर्यास वाटणीपत्राद्वारे जमीन नावे करुन देण्यासाठी १ हजार रुपयांची लाच घेताना धनेगाव सज्जाच्या तलाठ्यास गुरुवारी रंगेहात पकडले आहे़

लाच घेताना तलाठी गजाआड
लातूर : देवणी तालुक्यातील सय्यदपूर येथील येथील एका शेतकर्यास वाटणीपत्राद्वारे जमीन नावे करुन देण्यासाठी १ हजार रुपयांची लाच घेताना धनेगाव सज्जाच्या तलाठ्यास गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे़ याप्रकरणी देवणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ सय्यदपूर येथील एका शेतकर्याचे व त्याच्या भावाच्या नावे सर्वे नंबर ८५, ८६, ८९ व ९१ मध्ये शेती आहे़ ही शेती वाटणीपत्राआधारे तक्रारदार शेतकरी, त्याची पत्नी, भाऊ, भावजय व वडिलांच्या नावाने करुन वरिष्ठांकडून तसा फेरफार मंजूर करुन देण्याचा अर्ज तक्रारदाराने धनेगाव सज्जाचे तलाठी माधव अर्जून बिरादार यांच्याकडे दिला होता़ मात्र त्यांनी या कामासाठी १ हजार रुपयांची लाच मागितली़ यासंदर्भात शेतकर्याने लातूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती़ त्यानुसार ८ मे रोजी अॅन्टीकरप्शनचे उपाधीक्षक एऩ जी़ अंकुशकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि़ पंकज भालेराव, अभिमन्यू साळुंके, पोहेकॉ़ विलास मलवाडे, अशोक गायकवाड, मुख्तार शेख, परमेश्वर अभंगे, बालाजी जाधव, सदानंद योगी, नानासाहेब जाधवर, विष्णू गंडरे, स्वामी यांच्या पथकाने वलांडी येथील तलाठी सज्जा येथे सापळा रचला़ यावेळी तलाठी माधव बिरादार हे तक्रारकर्त्याकडून १ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात सापडले़ (प्रतिनिधी)