औरंगाबाद : प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि अपघात टाळण्यासाठी रिक्षांची उजवी बाजू बंद करणे नियमानुसार बंधनकारक आहे. परंतु शहरातील बहुतांशी अनेक रिक्षा या नियमाकडे दुर्लक्ष करून धावत आहेत. प्रवाशांनी डाव्या बाजूनेच उतरणे अपेक्षित आहे. परंतु नियमाकडे कानाडोळा करून अनेक रिक्षांमध्ये अद्यापही दोन्ही बाजूंनी चढ-उतार होताना दिसून येत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसह अपघाताचा धोका आहे. नियमानुसार रस्त्याच्या डाव्या बाजूला रिक्षा, अॅपेरिक्षा थांबविणे आणि त्याच बाजूने प्रवाशांना उतरविणे अपेक्षित आहे. यामुळे रस्त्यावर पाठीमागून येणाऱ्या वाहनचालकांना अडथळा होत नाही. परंतु शहरातील जालना रोडसह विविध मार्गांवर अनेक रिक्षा रस्त्यावर कोणत्याही ठिकाणी थांबतात आणि कोणत्याही बाजूने प्रवाशांना उतरविताना दिसून येत आहे. अनेक वेळा यामुळे किरकोळ अपघात होेतात. अशा घटना टाळण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून रिक्षांची उजवी बाजू बंद क रणे आवश्यक आहे. परंतु याकडे अनेक दुर्लक्ष होत आहे.प्राधिकरणाचा निर्णय प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची २३ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. त्यात रिक्षाची उजवीकडील बाजू बंद करण्याची अट रिक्षाच्या परवान्यास जोडण्यात यावी, तसेच या शर्तीचे भंग केल्याचे आढळून आल्यास मोटार वाहन अधिनियम १९८८ मधील कलम ८६ नुसार कारवाई करण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे.
शहरातील रिक्षांचा नियमाकडे कानाडोळा
By admin | Updated: July 7, 2015 00:40 IST
औरंगाबाद : प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि अपघात टाळण्यासाठी रिक्षांची उजवी बाजू बंद करणे नियमानुसार बंधनकारक आहे.
शहरातील रिक्षांचा नियमाकडे कानाडोळा
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}