शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

४०० वाहनांवर कारवाईचा बडगा

By admin | Updated: August 20, 2014 01:52 IST

लातूर : जिल्हा पोलीस अधीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या सूचनेवरून लातूर शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी शहरात अचानकपणे वाहन तपासणी मोहिम हाती घेतली़

लातूर : जिल्हा पोलीस अधीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या सूचनेवरून लातूर शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी शहरात अचानकपणे वाहन तपासणी मोहिम हाती घेतली़ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी शहरातील गर्दीच्या ठिकाणी वाहनांची तपासणी सुरू केली आहे़ दोन दिवसांत वाहन तपासणीत ४०० वाहनांवर कारवाई करण्यात आली असून ५० हजार ८०० रूपये दंड वसूल करण्यात आला आहे़ लातूर शहरातील गांधी चौक, गुळ मार्केट, राजीव गांधी चौक, नांदेड रोड आदी ठिकाणी शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी वाहन तपासणी मोहिम सुरू केली़ या मोहिमेत कागदपत्र, वाहन परवाना, टिबल सीट, अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे़ त्यात वाहन परवाना नसलेल्या ६०, कागदपत्र नसलेले ७१, दुचाकीवर टिबल सीट वाहतूक १३, अवैध प्रवासी वाहतूक ७, एकेरी मार्गाचे उल्लंघटन, धरधाव निघालेल्या वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली़ अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करून ७ हजार, परवान नसणाऱ्या ६० जणांकडून ६ हजार, कागदपत्र नसलेल्या ७१ जणांकडून ७ हजार १०० रूपये, भरधाव वेगाने निघलेल्या अशा १६१ वाहनधारकांकडून २२ हजार ८०० रूपये दंड वसूल करण्यात आला आहे़ मंगळवारी दिवसभर विविध ठिकाणी वाहतूक शाखेच्या पोलिसांनी वाहन तपासणी मोहिमेअंतर्गत २३१ वाहनांवर कारवाई करून २८ हजार रूपयांचा दंड वसूल केला आहे़ रहदारीस अडथळा निर्माण करणारे आॅटो, अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने, वाहन परवाना आदींचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे़ दोन दिवसांपासून कागदपत्र तपासणी मोहिम सुरू करण्यात आली असून विद्यार्थी, आॅटोचालकांनी कागदपत्रे सोबत बाळगावीत असे आवाहन पोलिसांनी केले़(प्रतिनिधी)