शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
4
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
5
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
6
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
7
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
8
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
9
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
10
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
11
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
12
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
13
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
14
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
15
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
16
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
17
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
18
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
19
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
20
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

गरजेनुसार उपाययोजना आखा

By admin | Updated: February 9, 2015 00:45 IST

लातूर : कोणत्या गावात कशाप्रकारची पाणीटंचाई आहे, त्या गावात कोणत्या उपाययोजना करण्याची गरज आहे, याचा अभ्यास करून उपाययोजना करण्यात याव्यात

लातूर : कोणत्या गावात कशाप्रकारची पाणीटंचाई आहे, त्या गावात कोणत्या उपाययोजना करण्याची गरज आहे, याचा अभ्यास करून उपाययोजना करण्यात याव्यात. शिवाय, प्रादेशिकस्तरावर काही योजना मंजुरीसाठी असतील, तर त्याचे प्रस्ताव पाठवावेत, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी रविवारी येथे केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळी व पाणीटंचाईच्या कामांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना व सुरू असलेल्या कामांची माहिती दिली. यावेळी विभागीय आयुक्त दांगट म्हणाले, विहिरी, विंधन विहिरी व अन्य अधिग्रहण करताना त्या गावांत कोणती गरज आहे, याचा आढावा घेण्यात यावा. गरजेनुसार त्या गावातील पाणीटंचाईचे निवारण करावे. नाला सरळीकरण, खोलीकरण करण्यासाठी शासनाकडे यंत्र उपलब्ध झाली आहेत. या यंत्राद्वारे जून अखेरपर्यंत गाळ काढण्याचे नियोजन करावे. काढलेला गाळ सर्व शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित यंत्रणेने प्रयत्न करावेत. जलयुक्त शिवार अभियान, पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम आणि कृषी विभागाच्या जलसिंचन योजना प्रभावीपणे राबवून पाणीटंचाईवर लक्ष केंद्रित करावे, असे निर्देशही विभागीय आयुक्त दांगट यांनी दिले. बैठकीला जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे, मनपा आयुक्त सुधाकर तेलंग, अपर जिल्हाधिकारी डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तुकाराम मोटे यांच्यासह सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)जलयुक्त शिवार अभियानात जिल्ह्यातील २०२ गावांचा समावेश आहे. या गावांतील ग्रामस्थ, लोकप्रतिनिधींना अभियानात सहभागी करून योजनांची अंमलबजावणी करावी. अधिकाऱ्यांनी योजना राबविण्यासाठी सर्व स्तरातील लोकांसोबत समन्वय साधावा. पाणलोट क्षेत्र विकास हा मुख्य उद्देश असून, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमाची मूळ संकल्पना समजावून घेऊन कामे तात्काळ सुरू करावीत. तलावातील तसेच जलस्त्रोतांतील गाळ काढणे व काढलेला गाळ सर्व शेतकऱ्यांना देणे हे या अभियानात अभिप्रेत आहे. अभियानातील कामे पारदर्शक होण्यासाठी दक्षता घ्यावी, असेही ते म्हणाले.