शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलदारांना धारेवर धरले

By admin | Updated: February 27, 2016 00:13 IST

कुरूंदा : वसमतच्या तहसीलदार सुरेखा नांदे यांनी गुरूवारी दुपारी ग्रामपंचायत कार्यालयात आल्या असता संतप्त ग्रामस्थांनी त्यांना धारेवर धरून स्वस्त धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या.

कुरूंदा : येथे निराधार योजनेतील मंजूर लाभार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी वसमतच्या तहसीलदार सुरेखा नांदे यांनी गुरूवारी दुपारी ग्रामपंचायत कार्यालयात आल्या असता संतप्त ग्रामस्थांनी त्यांना धारेवर धरून स्वस्त धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या. तब्बल एक तास हा गोंधळ सुरू होता. कुरूंदा येथे निराधार योजनेतील लाभार्थ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. कुरूंदा सर्कलअंतर्गत २४ लाभार्थ्यांची निराधार योजनेमध्ये अर्ज मंजूर झाले आहेत. त्यांची चौकशी करण्यासाठी कुरूंद्यात तहसीलदारांची बैठक आयोजित होती. ग्रामपंचायत कार्यालयात तहसीलदार सुरेखा नांदे आल्या असता संतप्त ग्रामस्थ व महिलांनी स्वस्त धान्य मिळत नसून, तक्रारी करूनही त्याचा काहीच उपयोग होत नसल्याचे सांगत संताप व्यक्त केला. कुरूंद्यात स्वस्त धान्य दुकानदार मनमानी कारभार करून लाभार्थ्यांशी आरेरावी करतात, वेळेवर माल वाटप करीत नाहीत, कमी प्रमाणात माल देतात अशा तक्रारी करण्यात आल्या. यावेळी स्वस्त धान्य प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश मंडळ अधिकाऱ्याला तहसीलदार सुरेखा नांदे यांनी दिले. बैठकीस सरपंच रेखाताई इंगोले, मंडळ अधिकारी अंभोरे, तलाठी आर. डी. राऊत, चंद्रकांत दळवी, दत्तराव इंगोले, शेख फारूख हवालदार, विश्वनाथराव दळवी, बाबुराव शेवाळकर आदींची उपस्थिती होती. या गोंधळामध्ये दारूबंदीचाही प्रश्न महिलांनी आक्रमकपणे मांडला. (वार्ताहर)