शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेत फिरवली तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 00:13 IST

प्रवाशांच्या गर्दीने खचाखच भरलेल्या नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेसच्या बोगीत एकाने अडीच फूट तलवार फिरविल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी औरंगाबाद ते दौलताबाददरम्यान घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : प्रवाशांच्या गर्दीने खचाखच भरलेल्या नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेसच्या बोगीत एकाने अडीच फूट तलवार फिरविल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी औरंगाबाद ते दौलताबाददरम्यान घडली. या घटनेने प्रवाशांमध्ये दहशत पसरली. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी दोघांना अटक केली.जसपालसिंग दर्शनसिंग (२७, रा. जारखेलन खेरी, फत्तेहगड साहेब, पंजाब) व हरदीपसिंग चरणसिंग (३७, रा. कोटला विजवाडा, मन्नुपूर, फत्तेहगड साहेब, पंजाब) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. लोहमार्ग पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेस ही शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास औरंगाबादहून रवाना झाली. ही रेल्वे दौलताबादजवळ असताना रेल्वेतील डी-२ बोगीत एकाने अचानक तलवार फिरवीत प्रवाशांना धक्काबुक्की केली. सुदैवाने कोणी जखमी झाले नाही. या घटनेने बोगीत एकच गोंधळ उडाला. या घटनेची माहिती मनमाड लोहमार्ग पोलिसांना देण्यात आली. ही रेल्वे मनमाड येथे पोहोचताच दोघांना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी सतीश सराफ (रा. सिल्कमिलकॉलनी) यांनी फिर्याद नोंदविली असून, शुक्रवारी रात्री या दोघांना औरंगाबाद लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. या दोघांकडून एक तलावर आणि कुºहाड जप्त करून गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मिर्झा अन्वर बेग करीत आहेत. तलवार नेमक्या कोणत्या कारणामुळे उगारली, याची पोलिसांत नोंद नाही; परंतु जागेच्या वादातून ही घटना झाल्याचे प्रवाशांनी सांगितले.