वालसावंगीत चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री तीन घरे फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 17:59 IST2020-11-18T17:48:44+5:302020-11-18T17:59:47+5:30

चोरट्यांनी १ लाख ४० हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची

A swarm of thieves in Valsavangi; Three houses were blown up in one night | वालसावंगीत चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री तीन घरे फोडली

वालसावंगीत चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री तीन घरे फोडली

वालसावंगी : भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथे चोरट्यांनी एकाच रात्री तीन घरे फोडली. चोरट्यांनी १ लाख ४० हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना सोमवारी रात्री घडली. यामुळे गावात खळबळ उडाली आहे. 

येथील वसंता बेराड हे कुटुंबासह घरात झोपलेले असताना चोरट्यांनी दरवाजाला छिंद्र पाडून कडी उघडली. घरात प्रवेश करून कपाटाची झाडाझडती घेतली असता काहीच सापडले नाही. घरात लटकलेल्या कपड्यांची झाडाझडती घेऊन तीन हजार रूपये लंपास केले.  यानंतर जि.प.सदस्य शंकर भुते यांच्या घरात प्रवेश करून चोरट्यांनी ५० हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला. 

शंकर भुते यांच्या पत्नीला घरात चोरी होत असल्याचे कळताच त्यांनी आरडाओरड केली. त्यानंतर चोरट्यांनी पळ काढला. विष्णू दळवी यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश करून खिडकी जवळ असलेली सोन्याची ४० हजार रूपये किंमतीची पोत चोरून नेली. याची माहिती जि.प. सदस्य शंकर भुते यांनी पारध पोलिसांना दिली.  पारध पोलीस ठाण्याचे सपोनि रमेश जायभाये, उपनिरीक्षक प्रदीप उबाळे, बीट जमादार प्रदीप सरडे, सुरेश पडोळ, दिनेश पायघन यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

Web Title: A swarm of thieves in Valsavangi; Three houses were blown up in one night