शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम विभागातील ३ अभियंत्यांचे निलंबन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 00:43 IST

सार्वजनिक बांधकाम विभागातील औरंगाबाद-जालना मंडळातील दोन व जळगाव येथे कार्यरत असलेल्या कार्यकारी अभियंत्याच्या निलंबनाचे आदेश लोकायुक्तांनी केलेल्या चौकशीनंतर बांधकाम खात्याने जारी केले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सार्वजनिक बांधकाम विभागातील औरंगाबाद-जालना मंडळातील दोन व जळगाव येथे कार्यरत असलेल्या कार्यकारी अभियंत्याच्या निलंबनाचे आदेश लोकायुक्तांनी केलेल्या चौकशीनंतर बांधकाम खात्याने जारी केले आहेत.जालन्यातील एका कामात २५ लाख रुपयांचे बिल दोनदा मंजूर करण्यात आले. २५ लाख रुपयांची रक्कम तत्कालीन सांप्रत विभागाचे कार्यकारी अभियंता जी.एच. राजपूत, उपअभियंता एस.के. ताजी, कनिष्ठ अभियंता डी.ए. गायकवाड यांनी दुसºयांदा मंजूर करून गैरव्यवहार केला.जून २०१६ मध्ये ‘लोकमत’ने हे प्रकरण प्रकाशात आणल्यानंतर स्थानिक पातळीवर याप्रकरणी वाच्यता झाली. २५ लाख रुपयांची रक्कम तिघांनी बांधकाम खात्याकडे भरणा केली. दरम्यान, लोकायुक्तांकडे याप्रकरणी तक्रार झाल्यानंतर चौकशी सुरू झाली. २५ लाख रुपयांची रक्कम जर राजपूत, ताजी, गायकवाड यांनी भरणा केली असेल तर ते दोषी आहेत, असा ठपका लोकायुक्तांनी ठेवला.सध्या राजपूत हे जळगाव येथे कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहेत. उपअभियंता ताजी हे जालन्यात, गायकवाड हे कन्नड उपविभागात कार्यरत आहेत. या तिन्ही अभियंत्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. विभागाचे अव्वर सचिव जी.बी. शिंदे यांच्या स्वाक्षरीने निलंबनाचे आदेश जारी करण्यात आले आहेत. अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांनी सांगितले, निलंबनाचे आदेश प्राप्त झाले आहेत. २०१५-२०१६ या आर्थिक वर्षात जालन्यातील बिलाच्या अफरातफरीमध्ये ही कारवाई करण्यात आलेली आहे. दरम्यान, बांधकाम विभागामध्ये अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार वाढल्याची प्रकरणे चव्हाट्यावर आली आहेत. मध्यंतरी वैजापूर, फुलंब्री तालुक्यातील काही कामांमधील गैरव्यवहारात अभियंत्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला होता.