शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

लाचप्रकरणात ‘एएसआय’ निलंबीत

By admin | Updated: March 28, 2015 00:43 IST

उस्मानाबाद : दारूबंदीची केस न करण्यासाठी २००० रूपयांचा हप्ता घेताना जेरबंद करण्यात आलेल्या सहाय्यक पोलीस फौजदारास पोलीस अधीक्षकांनी निलंबीत केले आहे़

उस्मानाबाद : दारूबंदीची केस न करण्यासाठी २००० रूपयांचा हप्ता घेताना जेरबंद करण्यात आलेल्या सहाय्यक पोलीस फौजदारास पोलीस अधीक्षकांनी निलंबीत केले आहे़ निलंबनाचे आदेश शुक्रवारी काढण्यात आले असून, एसीबीने मंगळवारी दुपारी सरमकुंडी फाट्यावर कारवाई केली होती़याबाबत माहिती अशी की, कन्हेरी पारधी पेढीवरील एक महिला व तिच्या पतीने दारूविक्रा व्यवसाय बंद करून मजुरीने कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू केला होता़ मात्र, कन्हेरी गावचे बीट अंमलदार सपोफौ किसन देविदास पवार हे त्या इसमाच्या पत्नीकडे जावून ‘तुम्ही आजूनही दारूविक्री करता, तेव्हा मला महिन्याला दोन हजार रूपये हप्ता द्यायलाच पाहिजे, नाहीतर मी तुमच्यावर दारूबंदीची केस करीन’, असे सांगून दोन महिने २००० रूपये नेले़ तसेच मार्च महिन्यात त्यांना पैसे न दिल्याने त्यांनी पाच हजार रूपयांची मागणीचा तगादा लावल्याची तक्रार ‘एसीबी’कडे दाखल झाली होती़ या तक्रारीवरून एसीबीच्या उपाधीक्षक अश्विनी भोसले यांनी सरमकुंडी फाट्याजवळील एका हॉटेलमध्ये सापळा रचून पाच हजार रूपयांचा मागणी करून २००० रूपये घेतल्यानंतर सपोफौ पवार यांच्याविरूध्द कारवाई केली होती़ याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ या घटनेचा अहवाल आल्यानंतर पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे यांनी शुक्रवारी सपोफौ किसन पवार यांना निलंबीत केले आहे़ या कारवाईमुळे लाचखोरांचे धाबे दणाणले आहेत़ (प्रतिनिधी)