शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
3
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
4
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
5
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
6
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
7
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
8
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
9
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
10
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
11
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
12
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
13
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
14
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
15
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
16
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
17
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
18
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
19
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
20
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
Daily Top 2Weekly Top 5

करणी केल्याचा संशय; पत्नीची हत्या

By admin | Updated: July 4, 2014 00:19 IST

मुखेड : करणी केल्याच्या संशयावरुन पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना शिकारा ता. मुखेड येथे २ जुलैच्या रात्री घडली. याप्रकरणी मुखेड पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

मुखेड : करणी केल्याच्या संशयावरुन पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना शिकारा ता. मुखेड येथे २ जुलैच्या रात्री घडली. याप्रकरणी मुखेड पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.सावळी ता. बिलोली येथील सुनीता नागनाथ कंदमवाड हिचा विवाह शिकारा ता. मुखेड येथील रामदास लक्ष्मण आचेवाडसोबत १० वर्षांपूर्वी झाला होता. याकाळात त्यांना दुर्गा(वय ६), प्रल्हाद(वय ८) ही दोन अपत्येही झाली. रामदास यांना गेल्या अनेक दिवसापासून पोटाचा विकार आहे. त्याला पत्नीवर संशय होता. पत्नीने करणी केल्यानेच विकार झाल्याचा संशय रामदास यांच्या मनात घर करुन गेला. याच कारणावरुन पत्नीशी वाद घालून तो तिला मारहाणही करायचा. पती आपल्यावर विनाकारण संशय घेवून मारहाण करीत असल्याने सुनीताने ही बाब माहेरी सांगितली. समाजातील काही लोकांनी याबाबत मध्यस्ती करुन रामदासची समजूत काढली, चांगल्या रुग्णालयात जावून उपचार करण्याचा सल्लाही दिला.याच कारणावरुन २ जुलैच्या रात्री दोघा पती-पत्नीत वाद झाला. रामदासने पत्नीच्या गळ्यावर, मानेवर, पोटावर, पायावर कत्तीने वार केले. यावेळी ‘बाबा, आईला मारु नका,’ म्हणून दोन्हीही लेकरांनी टाहो फोडला. मात्र पत्नी बेशुद्ध होईपर्यंत तिला रामदास मारहाणच करीत राहिला. या घटनेची स्वत:हून माहिती पोलिस ठाण्यात जावून दिली. गंभीर जखमी सुनीता यांना गावकऱ्यांनी मुखेडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, पुढे नांदेड येथे हलविण्याचा प्रयत्न केला, मात्र रस्त्यात असतानाच सुनीताने दम सोडला. मयताच्या भाऊ राजू कंदमवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी पती रामदासविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला. देगलूरचे उपविभागीय अधिकारी प्रशांत स्वामी तपास करीत आहेत.(वार्ताहर)