शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
4
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
5
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
6
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
7
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
8
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
9
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
10
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
11
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
12
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
13
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
14
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
15
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
16
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
17
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
18
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
19
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
20
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
Daily Top 2Weekly Top 5

सुमित सरदेशपांडेच्या आयुष्याचा दोर मजबूत!

By admin | Updated: September 18, 2014 00:41 IST

औरंगाबाद : बीड बायपास रोडवरील अरुणोदय कॉलनीत राहणाऱ्या सुमित सुशील सरदेशपांडे या १३ वर्षीय मुलाला ब्रेन हॅमरेज झाले

औरंगाबाद : बीड बायपास रोडवरील अरुणोदय कॉलनीत राहणाऱ्या सुमित सुशील सरदेशपांडे या १३ वर्षीय मुलाला ब्रेन हॅमरेज झाले असून, त्याच्यावर औषधोपचार करण्यासाठी तब्बल १२ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे वृत्त बुधवारी ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले. सुमितच्या मदतीसाठी आज तब्बल १६ दानशूर मंडळींनी पुढाकार घेऊन सिग्मा हॉस्पिटलमध्ये ७० हजार रुपये जमा केले.२८ आॅगस्ट रोजी शाळेत खेळत असताना सुमित सरदेशपांडे याचा अचानक ब्रेन हॅमरेज झाला. त्याच्यावर सिग्मा हॉस्पिटलमध्ये औषधोपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या असून, डोक्यात पुन्हा रक्तस्राव होऊ नये म्हणून युरोपमधून काही औषधोपचार द्यायचा आहे. या सर्व प्रक्रियेसाठी तब्बल १२ लाख ७० हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सुमितचे वडील सुशील सरदेशपांडे चिकलठाणा एमआयडीसीमध्ये एका कंपनीत कामगार आहेत. त्यांनी आपल्या ऐपतीनुसार आतापर्यंत २ लाख ७० हजार रुपये खर्चही केले. पुढील औषधोपचारासाठी त्यांनी दानशूर मंडळींना मदत करण्याचे आवाहन केले.बुधवारी यासंदर्भात ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रकाशित करताना सिग्मा हॉस्पिटलमध्ये जाऊन अनेक नागरिकांनी चौकशी केली. काहींनी जागेवरच आर्थिक मदत केली. अशाच पद्धतीने मदतीचा ओघ सुरू राहिल्यास सुमितच्या आयुष्याचा दोर आणखी मजबूत होईल, असा विश्वास त्याच्यावर औषधोपचार करणाऱ्या डॉक्टरांनी आणि वडिलांनी व्यक्त केला.