शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी उसाची वाढ खुंटली

By admin | Updated: July 30, 2014 00:47 IST

पाथरी : यावर्षी सुरुवातीपासून पाऊस पडला नाही़ गतवर्षी या परिसरात चांगला पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी उसाची मोठी लागवड केली होती;

पाथरी : यावर्षी सुरुवातीपासून पाऊस पडला नाही़ गतवर्षी या परिसरात चांगला पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी उसाची मोठी लागवड केली होती; परंतु, यावर्षी जूनमध्ये पाऊस न पडल्याने उसाची वाढ पूर्णत: खुंटली आहे़ परिणामी ऊस उताऱ्यामध्ये मोठी घट येणार असल्याचे दिसून येत आहे़पाथरी तालुका हा उसाचे भांडार म्हणून ओळखला जातो़ गोदावरी नदी पात्रात ढालेगाव आणि मुदगल येथे बांधण्यात आलेले बंधारे आणि या तालुक्यातून जायकवाडीचा डावा कालवा गेल्यामुळे या भागात सिंचनाचे क्षेत्र मोठे आहे़ या भागातील शेतकरी प्रामुख्याने कापसाच्या पिकासोबतच ऊसाचीही लागवड करतो़ या तालुक्यात लिंबा येथील योगेश्वरी शुगर आणि पाथरी येथील रेणुका शुगर हे दोन कारखाने आहेत़ गतवर्षी पाथरीचा रेणुका शुगर कारखाना सुरू झाला नव्हता़ गतवर्षी चांगला पाऊस पडल्याने जमिनीच्या पाणी पातळीत वाढ झाली होती़ नदी, नाले ओसंडून वाहिले़ गोदावरी पात्रातील दोन्ही बंधारे पूर्ण क्षमतेने भरले़ त्यामुळे या तालुक्यात आॅक्टोबर ते डिसेंबर २०१३ या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड झाली़ पाथरी कारखाना कार्यक्षेत्रात लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी ५ हजार मे़ टन क्षमतेचे बियाणे खरेदी करून ऊस लागवड केली़ सध्या सात महिन्यांचा ऊस असला तरी उसाची मोठी वाढ झाली नाही़ शेतातील उभा ऊस आठ ते दहा कांड्यावर आहे़ यामुळे उसात सध्या तरी परिपक्वता आली नाही़ जून आणि जुलै या दोन महिन्यांत पाऊसच न पडल्यामुळे उसाची वाढ खुंटली़ परिणामी ऊस उताऱ्यावर याचा परिणाम होणार आहे़ (वार्ताहर)२० टनांचाही उतारा नाहीया भागातील शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनावर उसाची लागवड केली़ महागडे बियाणे खरेदी करून मोठा खर्चही केला़ परंतु, पाऊस पडत नसल्याने यावर्षी शेतकऱ्यांच्या उसाला प्रती एकर २० टनापेक्षा अधिक उतारा येणार नाही़, अशी प्रतिक्रिया रेणापुरी येथील ज्येष्ठ ऊस उत्पादक शेतकरी दत्तराव टेंगसे यांनी दिली़