अचानक रस्त्यामध्ये आलेल्या रिक्षाला उडवत टिप्पर दुकानांत घुसले; दोन्ही चालक गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 15:24 IST2024-01-18T15:23:02+5:302024-01-18T15:24:31+5:30
कुंभेफळ येथे टीप्पर दुकानात घुसल्याने एकच खळबळ

अचानक रस्त्यामध्ये आलेल्या रिक्षाला उडवत टिप्पर दुकानांत घुसले; दोन्ही चालक गंभीर जखमी
करमाड: छत्रपती संभाजीनगर जालना महामार्गावर कुंभेफळ चौकात जालन्याकडे जात असताना लोखंडी सळया घेऊन जाणारी माल वाहतूक करणारी चारचाकी रिक्षा अचानक मध्ये आल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात टिप्पर चालकाला टिप्पर डाव्या बाजूला घ्यावे लागले. त्यावेळी या रिक्षाला उडवून हे टिप्पर डाव्या बाजूला असलेल्या पत्राच्या शेड मधील दुकानात घुसल्याने तीन-चार दुकानांचे नुकसान झाले. सुदैवाने यात जीवित हानी झाली नसून दोन्ही वाहनांची चालक मात्र गंभीर जखमी आहेत.