विद्यापीठातील ग्रंथालय, वसतिगृहे सुरु करण्यासाठी विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 19:33 IST2021-01-06T19:28:41+5:302021-01-06T19:33:44+5:30

Student's Agitation at Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabad युजीसीने विद्यापीठ सुरु करण्याचे निर्देश दिल्यानंतरही येथील विद्यापीठ नियमित सुरु झाले नसल्याचे विद्यार्थी संघटनांचे म्हणणे आहे.

Students' thiyya agitation to start university libraries and hostels at Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabad | विद्यापीठातील ग्रंथालय, वसतिगृहे सुरु करण्यासाठी विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन

विद्यापीठातील ग्रंथालय, वसतिगृहे सुरु करण्यासाठी विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन

ठळक मुद्देग्रंथालय आणि हॉस्टेल सुरू झाले पाहिजे.ऑनलाईन शिक्षण बंद करून विभागातील तासिका सुरू कराव्यात 

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील हॉस्टेल, ग्रंथालय आणि नियमित तासिका सुरु करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन मुख्य इमारती समोर सुरु आहे. युजीसीने निर्देश दिल्यानंतरही येथील प्रशासनाने विद्यापीठ नियमित सुरु केले नसल्याचे विद्यार्थी संघटनांचे म्हणणे आहे.
राज्यातील शाळा आणि महाविद्यालयात ऑनलाईन शिक्षण बंद करून तासिका सुरु झाल्या आहेत. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील हॉस्टेल, ग्रंथालय आणि तासिका सुरु झाल्या नाहीत. हॉस्टेल आणि ग्रंथालय बंद असल्याने संधोधक विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहेत. यामुळे युजीसीच्या निर्देशानुसार प्रशासनाने विद्यापीठातील ऑनलाईन शिक्षण बंद करून विभागात नियमित तासिका सुरु करून ग्रंथालय आणि हॉस्टेल तत्काळ सुरु करावीत अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. 

रात्रीही सुरु होते ठिय्या आंदोलन
याबाबत विद्यार्थी संघटनांच्या शिष्टमंडळाने विद्यापीठ प्रशासनाला निवेदन दिले. यावर प्र-कुलगुरू श्याम शिरसाट यांनी जिल्हा प्रशासनासोबत बोलून निर्णय घेण्यात येईल अशी भूमिका घेतली. यामुळे संघटनांनी आक्रमक होत प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळणार नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार केला आहे. या आंदोलनात अमोल खरात, लोकेश कांबळे, श्रद्धा खरात, दीक्षा पवार, अक्षय जाधव, स्वाती चेके, नितीन वावले, अनिल जाधव , राम सुर्यवंशी, सुरेश सानप, रामेश्वर कबाडे, निशिकांत कांबळे, पांडुरंग भुतेकर, अविनाश सावंत, राम सूर्यवंशी आदींचा सहभाग आहे. 

या आहेत विद्यार्थ्यांच्या मागण्या : 
१. हॉस्टेल आणि ग्रंथालय सुरू करावे.
२. ऑनलाईन शिक्षण बंद करून विभागातील तासिका सुरू कराव्यात 

Web Title: Students' thiyya agitation to start university libraries and hostels at Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabad