कमी गुणांच्या भीतीने विद्यार्थिनीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 00:21 IST2019-04-02T00:21:01+5:302019-04-02T00:21:29+5:30

बारावीच्या परीक्षेत कमी गुण पडण्याच्या भीतीने विद्यार्थिनीने निकालापूर्वीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सिल्लोड तालुक्यातील शिवना येथे घडली. याप्रकरणी अजिंठा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

 Student's suicide due to fear of low marks | कमी गुणांच्या भीतीने विद्यार्थिनीची आत्महत्या

कमी गुणांच्या भीतीने विद्यार्थिनीची आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्क
शिवना : बारावीच्या परीक्षेत कमी गुण पडण्याच्या भीतीने विद्यार्थिनीने निकालापूर्वीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सिल्लोड तालुक्यातील शिवना येथे घडली. याप्रकरणी अजिंठा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
रुचा नंदकिशोर काळे (१८, रा. शिवना) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, शिवना येथील देशमुख गल्लीत राहणाऱ्या रुचा हिने नुकतीच १२ वीची परीक्षा दिली आहे. मात्र, या परीक्षेत कमी गुण मिळण्याच्या भीतीने तिने सोमवारी (दि.१) दुपारी १२.३० च्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.
गळफास घेतल्याचे लक्षात येताच कुटुंबियांनी तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. सोमवारी सायंकाळी ७ वाजता तिच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, निकाल लागण्यापूर्वीच रूचाने आत्महत्या केल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. सपोनि. किरण आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार दत्तात्रय मोरे अधिक तपास करीत आहेत.

Web Title:  Student's suicide due to fear of low marks