शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

प्रवेश नाकारल्याने विद्यार्थी संतप्त; केंद्रावर गोंधळ

By admin | Updated: June 13, 2016 00:45 IST

औरंगाबाद : बी. एड. अभ्यासक्रमासाठी रविवारी शहरातील विविध परीक्षा केंद्रांवर प्रवेश परीक्षा पार पडली. यावेळी काही परीक्षा केंद्रांवर विहित

 औरंगाबाद : बी. एड. अभ्यासक्रमासाठी रविवारी शहरातील विविध परीक्षा केंद्रांवर प्रवेश परीक्षा पार पडली. यावेळी काही परीक्षा केंद्रांवर विहित ओळखपत्र नसल्याच्या कारणामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त केल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यावर्षी प्रथमच बी. एड. प्रवेश परीक्षा लेखी स्वरुपात न घेता आॅनलाईन पद्धतीने घेण्यात आली. एकूण सात केंद्रांवर ही परीक्षा तीन सत्रांत पार पडली. या परीक्षेसाठी सकाळच्या सत्रात मौलाना आझाद महाविद्यालयातील केंद्रावर आलेल्या २५ ते ३० विद्यार्थ्यांना ओळखपत्राच्या कारणावरून प्रवेश नाकारण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी ओळखपत्र म्हणून इंटरनेटवरून आधार कार्डची प्रत आणली होती; परंतु ओळखपत्रासाठी ही प्रत नाकारण्यात आली. आधार कार्ड हवे, असे सांगून विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. याशिवाय काहींनी अर्ज करताना लग्नानंतरचे नाव नमूद केले. त्यामुळे अशांना विवाहाचे प्रमाणपत्र, शपथपत्राशिवाय परीक्षेला बसू देण्यात आले नाही. त्यामुळेही अनेकांनी नाराजी व्यक्त केली. परीक्षेपासून वंचित ठेवण्यात आल्याने शिक्षक होण्याच्या स्वप्नावर पाणी फेरले गेल्याने तीव्र संताप विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. याविषयी उच्चशिक्षण सहसंचालक डॉ. राजेंद्र धामणस्कर म्हणाले, ओळखपत्राविषयी परीक्षार्थींना संपूर्ण क ल्पना देण्यात आली होती. त्यामुळे योग्य ओळखपत्राची पूर्तता न केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला.