शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
5
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
6
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
7
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
8
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
9
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
10
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
11
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
12
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
13
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
14
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
15
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
16
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
17
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
18
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
19
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
20
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
Daily Top 2Weekly Top 5

‘विद्यार्थ्यां’साठी वाट्टेल ते

By admin | Updated: July 2, 2014 00:30 IST

निवृत्ती भागवत , शंकरनगर मोठ्या गावांमध्ये आणि शहरांमध्ये इंग्रजी शाळांचे पेव फुटले आहे़ विद्यार्थी इंग्रजी शाळांकडे जात असल्यामुळे मराठी शाळांपुढे अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला.

निवृत्ती भागवत , शंकरनगरमोठ्या गावांमध्ये आणि शहरांमध्ये इंग्रजी माध्यमाच्या मागणीमुळे शाळांचे पेव फुटले आहे़ विद्यार्थी इंग्रजी शाळांकडे जात असल्यामुळे मराठी शाळांपुढे अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला. अस्तित्व टिकविण्यासाठी या शाळा साम,दाम, दंड, भेद नीतीचा वापर करीत आहेत़पाल्यांची बौद्धिक समता लक्षात न घेता पैशाच्या बळावर त्याला चांगल्यातल्या चांगल्या शाळेत ठेवून डॉक्टर किंवा इंजिनिअर करावा, अशी भावना गेल्या पाच-सहा वर्षांपासून पालक वर्गात वाढीस लागली आहे़ आपल्या पाल्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी प्रारंभी पाचगणी सारख्या ठिकाणी पालक एलकेजीपासून लाखावर रूपये फी भरून ठेवत असत़ पालकांमध्ये जसजसे इंग्रजी शाळांचे आकर्षण निर्माण झाले तस-तसे काही सेवाभावी वृत्तीने तर काही धंदेवाईक वृत्तीने संस्था चालक पुढे आले़ इंग्रजी शाळा काढल्यानंतर खूप फायदा मिळतो याची जाणीव होताच शहरासह मोठ्या गावात कुत्र्याच्या छत्र्यांप्रमाणे इंग्रजी शाळा उदयाला आल्या आहेत़ आॅक्सफर्ड, केंब्रीज, हॉर्वर्डसारख्या गाजलेल्या नावांचा तर संत तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव यांच्यासारख्या संतांच्या व राजा राममोहन रॉय, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, लोकमान्य टिळक यांच्यासारख्या समाजकारणी, राजकारणी व्यक्तींच्या नावाने इंग्रजी शाळा सुरू झाल्या आहेत़ काही संस्थाचालकांनी नद्या, ऐतिहासिक स्थळे, लक्ष्मी, सरस्वती, बालाजी, तिरूपती यांच्या नावाने शाळा सुरू केल्या आहेत़ सध्या ५० ते १०० च्या घरांच्या वस्तीत ही इंग्रजी शाळा पाहण्यास मिळत असून एखाद्या गोठ्यात, गोदामात, जुन्या घरात, टीनशेडमध्ये फर्निचरचा अभाव, शैक्षणिक साहित्याचा अभाव असतानाही या शाळा जोरात चालू आहेत़ इंग्रजी शाळांची संख्या दरवर्षी वाढत चालल्यामुळे मराठी शाळांकडे संख्या दरवर्षी वाढत, घटत चालली आहे़ तुकडी नसलेल्या १ ली ते ७ वी पर्यंतच्या जि़प़, खाजगी शाळांना प्रत्येक वर्गासाठी किमान ३० विद्यार्थी मिळविणे अवघड होवून बसले आहे़ त्यामुळे खाजगी शाळांचे संस्था चालक शिक्षकांच्या पैशातूनच आॅटो लावणे, गणवेश देणे, वह्या देणे, गोरगरीब पालकांना राशन देणे, कपडे देणे असे अनेक प्रकार करून स्वत:ची संस्था व शिक्षकांची पदे वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत़ संस्थाचालकांची मनमानी, मुजोरीकाही तुरळक सन्माननीय अपवाद वगळता अनेक शाळांत अप्रशिक्षित शिक्षक ज्यात १०वी, १२ वी, बी़ए़, बीक़ॉम़ बी़एस्सी पदवी उत्तीर्ण- अनुत्तीर्ण उमेदवार ज्ञानदानाचे (?) कार्य करीत आहेत़ या महान कार्यासाठी त्यांना संस्था चालकांकडून दरमहा १५०० ते १० हजार पर्यंत वेतन मिळत आहे़ खेड्यापाड्यात नव्याने सुरू झालेल्या इंग्रजी शाळांनी जाहिरातीचा भडीमार सुरू केला आहे़ प्रशिक्षित शिक्षक, सर्व सुविधांनी युक्त शाळा, सुंदर व व्यापक परिसर, खेळाचे मैदान, खेळाचे, शैक्षणिक साहित्य आदी उपलब्ध आहे की नाही ते न पाहता पालक डे-स्कॉलर आणि निवासी स्वरुपात आपल्या पाल्यांना इंग्रजी शाळेत पाठवत आहेत़ शासन अशा शाळांना अनुदान देत नसल्यामुळे वरील बाबींकडे फारसे लक्ष देण्यात येत नाही़ त्यामुळे अनेक ठिकाणी संस्थाचालकांची मनमानी व मुजोरी वाढली आहे़