विद्यार्थी संघटनेचे आता बेमुदत उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:11 IST2021-01-08T04:11:51+5:302021-01-08T04:11:51+5:30

विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर ६ रोजी दुपारी १२ वाजेपासून विद्यार्थी संघटनेने ठिय्या आंदोलनास सुरुवात केली. प्रशासनाने या आंदोलनाची ...

The student union is now on an indefinite hunger strike | विद्यार्थी संघटनेचे आता बेमुदत उपोषण

विद्यार्थी संघटनेचे आता बेमुदत उपोषण

विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर ६ रोजी दुपारी १२ वाजेपासून विद्यार्थी संघटनेने ठिय्या आंदोलनास सुरुवात केली. प्रशासनाने या आंदोलनाची दखल न घेतल्याने विद्यार्थी कृती समितीने आंदोलन अधिक उग्र करीत बेमुदत उपोषणाला सुरुवात केली.

युजीसीने आदेश दिल्यानंतरही प्रशासनाने विद्यापीठ नियमित सुरू केलेले नाही, असे विद्यार्थी संघटनेचे म्हणणे आहे. विद्यार्थी संघटनेने विद्यापीठ प्रशासनालाही निवेदन दिले. विद्यापीठ प्रशासनाने गुरुवारी आंदोलनकर्त्यांशी भेट घेतली. वसतिगृहे, ग्रंथालये सुरू करणे हे जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारित आहे. त्यामुळे जोपर्यंत त्यांचा निर्णय येणार नाही, तोपर्यंत ग्रंथालये व वसतिगृहे सुरू होणार नाहीत. तसेच जोपर्यंत महाराष्ट्र शासनाचे आदेश येणार नाहीत, तोपर्यंत तासिका सुरू होऊ शकत नाहीत, असे प्रशासनातर्फे आंदोलक विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.

जोपर्यंत आम्हाला लेखी काही देण्यात येत नाही आणि विद्यापीठ जोपर्यंत पूर्णवेळ सुरू होणार नाही, तोपर्यंत आम्ही सर्व बेमुदत उपोषण करणार आहोत, असे अमोल खरात, दीक्षा पवार, लोकेश कांबळे, रामेश्वर पाटील, पांडुरंग भुतेकर, श्रद्धा खरात यांनी सांगितले.

फोटो ओळ :

विद्यापीठ पूर्णवेळ सुरू करावे या मागणीसाठी बेमुदत उपोषणाला बसलेेले विद्यार्थी.

Web Title: The student union is now on an indefinite hunger strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.