कडक सॅल्यूट! पोलीस कॉन्स्टेबल झाले डॉक्टर, उर्दूत विषयात घेतली सर्वोच्च पीएचडी पदवी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 18:00 IST2022-07-14T17:57:27+5:302022-07-14T18:00:42+5:30
पीएच.डी. पदवी मिळविणारे इरफान खान पहिले हेड कॉन्स्टेबल

कडक सॅल्यूट! पोलीस कॉन्स्टेबल झाले डॉक्टर, उर्दूत विषयात घेतली सर्वोच्च पीएचडी पदवी
औरंगाबाद : शहर पोलीस विभागात हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेले इरफान खान उस्मान खान यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पीएच.डी. पदवी प्रदान केली आहे. ते पीएच.डी. पदवी मिळविणारे पहिले हेड कॉन्स्टेबल ठरले आहेत.
खान यांनी या अगोदर उर्दू विषयांमध्ये मास्टर्स डिग्री तसेच जनसंवाद व पत्रकारिता या विषयात पदव्युत्तर पदवी मिळविलेली आहे. त्यांनी “सय्यद इम्तियाज अली ताज की ड्रामा निगारी का तनखीदी व तजजियाती मुताअला” या विषयावर मौलाना आझाद महाविद्यालयाच्या उर्दू विभागप्रमुख डॉ. काझी नवीद अहमद सिद्दिकी यांच्या मार्गदर्शनाखाली शोधप्रबंध सादर केला होता.
त्यांनी औरंगाबादचे पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, एडीजी संजय कुमार, आयजी डॉ. जय जाधव, सहायक पोलिस आयुक्त अशोक थोरात, माजी सहायक पोलिस आयुक्त डॉ. खुशालचंद बाहेती, आणि डॉ. एच. एस. भापकर यांचे सहकार्य मिळाल्यामुळे आभार प्रकट केले.
“पोलीस विभागातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पीएच.डी. पदवी मिळवली आहे, परंतु इरफान खान हे ही पदवी प्राप्त करणारे पहिले हेड कॉन्स्टेबल ठरले आहेत.”
- डॉ. खुशालचंद बाहेती, माजी सहायक पोलिस आयुक्त