छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात स्ट्रेचर ‘ब्रेक’; गोल्फ कार्ट ॲम्ब्युलन्सने रुग्णांची ने-आण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 15:40 IST2025-08-28T15:35:48+5:302025-08-28T15:40:02+5:30

या रुग्णवाहिकेमुळे रुग्णसेवेत आमूलाग्र बदल होऊन रुग्णांना वेळेत उपचार मिळतील.

Stretcher breaks down at Ghati Hospital in Chhatrapati Sambhajinagar; Golf cart ambulance transports patients | छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात स्ट्रेचर ‘ब्रेक’; गोल्फ कार्ट ॲम्ब्युलन्सने रुग्णांची ने-आण

छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात स्ट्रेचर ‘ब्रेक’; गोल्फ कार्ट ॲम्ब्युलन्सने रुग्णांची ने-आण

छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयास काही दिवसांपूर्वीच दोन बॅटरी ऑपरेटेड गोल्फ कार्ट ॲम्ब्युलन्स व दोन बॅटरी ऑपरेटेड सहा सीटर वाहन प्राप्त झाले. यातील दोन वाहनांच्या मदतीने मंगळवारपासून रुग्णांची ने-आण सुरू झाली आहे.

अधिष्ठाता डाॅ. शिवाजी सुक्रे म्हणाले, या रुग्णवाहिकेमुळे रुग्णसेवेत आमूलाग्र बदल होऊन रुग्णांना वेळेत उपचार मिळतील. पुढील ८ दिवसांत दुसऱ्या २ रुग्णवाहिकादेखील रात्री ८ ते सकाळी ८ या वेळेत सुरू राहतील. त्यानंतर दोन्हीही शिफ्टमध्ये सतत सुरू राहतील. ही वाहने प्राप्त होण्यासाठी विकृतीशास्त्र विभागप्रमुख डाॅ. भारत सोनवणे, विशेष कार्य अधिकारी डॉ. सुरेश हरबडे, डॉ. गायत्री तडवळकर, डॉ. सुचेता जोशी आदींचे सहकार्य मिळाले.

विकृतीशास्त्र विभागप्रमुख डाॅ. भारत सोनवणे म्हणाले, अपघात विभागातून रुग्णांना गोल्फ कार्ट ॲम्ब्युलन्सद्वारे मेडिसिन विभागात आणि सुपर स्पेशालिटी हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात येत आहे. यामुळे तत्काळ उपचार करणे शक्य होत आहे. गोल्फ कार्ट ॲम्ब्युलन्समुळे रुग्णांना लवकर दाखल करणे शक्य होत आहे.

Web Title: Stretcher breaks down at Ghati Hospital in Chhatrapati Sambhajinagar; Golf cart ambulance transports patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.