साठवण तलाव क्षमतेत दुपटीने वाढ
By Admin | Updated: June 6, 2016 00:18 IST2016-06-05T23:59:40+5:302016-06-06T00:18:16+5:30
जालना : सुमारे ९५० ट्रॅक्टर गाळ काढल्यामुळे माळाचा गणपती साठवण तलावाच्या क्षमतेत दुप्पट वाढ झाली आहे. रोटरी रेनबो क्लबच्या पुढाकारातून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

साठवण तलाव क्षमतेत दुपटीने वाढ
जालना : सुमारे ९५० ट्रॅक्टर गाळ काढल्यामुळे माळाचा गणपती साठवण तलावाच्या क्षमतेत दुप्पट वाढ झाली आहे. रोटरी रेनबो क्लबच्या पुढाकारातून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या गाळ उपशाला २९ मे रोजी प्रत्यक्ष सुरूवात झाली. त्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांनी प्रतिसाद देत गाळ नेला. इंडियन रेडीओलॉजीकल संघटनेचे माजी अध्यक्ष जिग्नेश ठक्कर यांच्या हस्ते गाळ उपसा कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी दिलीप राठी, शिवरतन मुंदडा यांची प्रामुख उपस्थिती होती. माळाचा गणपती परिसरातील अनेक शेतकऱ्यांचा या उपक्रमास प्रतिसाद मिळाला आणि त्यांनी आजपर्यंत ९५० ट्रॅक्टर गाळ शेतात टाकण्यासाठी नेला. दरम्यान, गाळ काढण्याची ही मोहीम पावसाळा सुरु होईपर्यंत चालूच ठेवली जाणार असल्याची माहिती प्रकल्प प्रमुख डॉ. सुरेश साबू, सचिव सुमित्रा गादिया आणि क्लबचे अध्यक्ष नितीन खंडेलवाल यांनी दिली. तलावातील गाळामुळे मुरमाड जमिन सुपिक होते. रासायनिक वा शेंद्रीय खताचा वापर कमी करावा लागतो. परिणामी खर्चात बचत होणार असल्याने गाळ नेण्यासाठी पुढाकार घेतला आहे. रोटरी रेनबोच्या उपक्रमाचे स्वागत होत आहे.