शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

चैत्यगृहाचे काम बंद

By admin | Updated: September 4, 2014 01:24 IST

सुमेध वाघमारे , तेर उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे पुरातन चैत्यगृह आहे. या चैत्यगृहाला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी जानेवारी २०१२ मध्ये पुरातत्व विभागाच्या वतीने उत्खनाला सुरुवात

सुमेध वाघमारे , तेरउस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे पुरातन चैत्यगृह आहे. या चैत्यगृहाला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी जानेवारी २०१२ मध्ये पुरातत्व विभागाच्या वतीने उत्खनाला सुरुवात करण्यात आली होती. बरीचशी कामे झाल्यानंतर निधीची कमतरता निर्माण झाल्याने उत्खननाचे काम बंद पडले आहे. विशेष म्हणजे २० लाख १७ हजार एवढ्या वाढीव निधीचा प्रस्ताव पुरातत्व विभागाकडे पाठवून एक वर्षाचा कालावधी लोटला. मात्र एक छदामही अद्याप प्राप्त झालेला नाही. १९६८ मध्ये येथे चैत्यगृहाचे अवशेष उघडकीस आले. त्यामुळे बौद्धकालीन धार्मिक वास्तुचा आणखी एक पुरावा समोर आला होता. याबाबत सखोल माहिती घेण्यासाठी डॉ. मोरेश्वर दिक्षीत यांनी उत्खनन केल्यानंतर अर्ध गोलाकृती चैत्यगृह आढळून आले. या चैत्यगृहाची लांबी १ मिटर व रुंदी ५.५. मिटर आहे. त्याचप्रमाणे समोरच्या भागात एक दरवाजा असून, चौकट लाकडी होती. दरवाज्यातून आत शिरण्यासाठी तीन पायऱ्याही आढळून आल्या होत्या. कालांतराने चैत्यगृहाच्या परिसरात भर टाकून उंची वाढविण्यात आली. स्तुपाच्या भोवताली २.७ बाय २ मिटर एवढ्या आकाराचा विटाचा चौथरा बांधण्यात आला. तसेच भिंतही बांधली. त्याचप्रमाणे लाकडी दरवाजा बंद करुन त्याठिकाणी भिंत बांधण्यात आली. नवे प्रवेशद्वार पहिल्यापेक्षा लहान आकाराचे होेते. या चैत्यगृहास गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी माजी आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या पुढाकारातून २५ लाखाचा निधी प्राप्त झाला होता. या माध्यमातून ११ जानेवारी २०१२ पासून उत्खननाला सुरुवात करण्यात आली. कालांतराने संरक्षण भिंत बांधून चैत्यगृहाचे उर्वरित बांधकाम पूर्ण करण्यात आले. जुलै २०१२ मध्ये चैत्यगृहाच्या संरक्षणाचे काम पुढे करीत उत्खनन केलेल्या भागावर ताडपत्री टाकून त्यावर माती टाकण्यात आली. २०१३ मध्ये चैत्यगृहावर पत्र्याच्या माध्यमातून छत तयार करण्यात आले. मात्र आजही अनेक कामे अपूर्ण आहेत. चैत्यगृहावरील छत विस्तारीत करणे, पाण्यासाठी आऊटलेट काढणे, मुख्य रस्त्यालगत गेट तयार करणे, पूर्ण झालेल्या कामाची डागडूजी करणे, पेवर ब्लॉक काढून नव्याने बसविणे आदी कामे बाकी आहेत.त्यातच निधी संपल्यामुळे सदर कामच बंद करण्यात आले असून, यामुळे हा ऐतिहासिक वारसा पुन्हा दुर्लक्षित झाला आहे. पुरातत्व विभागाच्या वतीने सर्व कामांचे आराखडे तयार करुन तब्बल एक वर्षापूर्वी एकत्रित प्रस्ताव पुरातत्व खात्याकडे सादर करण्यात आला होता. यासाठी २० लाख १७ हजार ६५७ रुपये एवढ्या वाढीव निधीची मागणीही करण्यात आली. मात्र हा प्रस्तावही पुरातत्व खात्याकडे धूळखात पडून आहे. प्रशासनाकडून डोळेझाक होत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. (वार्ताहर)अपूर्ण कामे मार्गी लावण्यासाठी २० लाख १७ हजार एवढ्या वाढीव निधीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केलेला आहे. हा निधी मंजूर होताच कामांना सुरुवात करण्यात येईल, असे पुरातत्व विभागाचे जतन सहाय्यक अभियंता आर. डी. निपाणीकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.