शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
2
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
3
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
4
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
5
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
6
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
7
आसाम, बंगालमधील विजयानंतर भाजपा ‘या’ राज्यात ऑपरेशन लोटसच्या तयारीत? बड्या नेत्याने दिले संकेत
8
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
9
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
10
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
11
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
12
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
13
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
14
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
15
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
16
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
17
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
18
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
19
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
20
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
Daily Top 2Weekly Top 5

भोंदूबाबाच्या अटकेसाठी रास्ता रोकोचा इशारा

By admin | Updated: June 17, 2014 01:13 IST

येरमाळा : एकनाथ सुभाष लोमटे या भोंदूविरूध्द येरमाळा पोलिस ठाण्यात जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल होऊन पाच दिवस उलटले तरी अद्याप अटक नाही.

येरमाळा : अंधश्रध्देला खतपाणी घालून भाविकांची आर्थिक लूट करणाऱ्या मलकापूर (ताक़ळंब) येथील एकनाथ सुभाष लोमटे या भोंदू महाराजाविरूध्द येरमाळा पोलिस ठाण्यात जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल होऊन पाच दिवस उलटले तरी अद्याप त्यास अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे २१ जून रोजी येरमाळा चौरस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे प्रदीप पाटील-खंडापूरकर यांनी दिला आहे.मलकापूर येथील एकनाथ महाराज लोमटे यांच्याविरूध्द १८ मार्च २०१४ रोजी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे प्रदीप पाटील-खंडापूरकर, शिवाजी गिड्डे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती़ तक्रारीत महाराज हा कुठल्याही रोगावर खात्रीशीर उपचार म्हणून जडीबुटी, बुक्का, लिंबू-नारळ, बिबा, मिरची अशा वस्तू देऊन पैसे घेत भोंदूगिरी करून नागरिकांची आर्थिक लूट करीत असल्याचे म्हटले होते़ यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी समितीमार्फत चौकशी केल्यानंतर १२ जून रोजी मंडळ अधिकारी भारत एकनाथ ओव्हाळ यांच्या फिर्यादीवरून येरमाळा पोलिस ठाण्यात महाराष्ट्र नरबळी इतर अमानुष, अनिष्ट जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला. असे असतानाही येरमळा पोलिसांकडून मात्र या भोंदू महाराजास अटक करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप खंडापूरकर यांनी केला आहे. दरम्यान, २० जूनपर्यंत अटक नाही झाल्यास २१ जून रोजी येरमाळा चौरस्त्यावर रास्ता रोको करण्याचा इशाराही खंडापूरकर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिला आहे. याबाबत फौजदार डी. जी. अहंकार यांच्याशी संपर्क साधला असता तपास चालू असून, लवकरच अटक करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)