शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

अन्यायाविरोधात अंबडला रास्ता रोको

By admin | Updated: February 2, 2016 00:24 IST

अंबड : दुष्काळाने हतबल झालेल्या शेतकऱ्यांना जालना येथील उपप्रादेशिक वाहन कार्यालयातील अधिकाऱ्यांनी अमानूष वागणूक दिल्याची घटना सोमवारी

अंबड : दुष्काळाने हतबल झालेल्या शेतकऱ्यांना जालना येथील उपप्रादेशिक वाहन कार्यालयातील अधिकाऱ्यांनी अमानूष वागणूक दिल्याची घटना सोमवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास खरेदी-विक्री संघ कार्यालयासमोर घडली. अ‍ॅपेरिक्षाने नियमांचा भंग केल्याचा आरोप करत अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे धान्याची पोती रोडवर फेकली. यावेळी पोते फुटून धान्य रस्त्यावर पसरले. शेतकऱ्यांना देण्यात येणारी अमानुष वागणूक पाहून संतप्त झालेल्या नागरिकांनी जालना-बीड मार्गावर रास्ता रोको केला. मात्र, पोलिसांनी मध्यस्थी करत नागरिकांना पांगविले. विशेष म्हणजे याच मार्गावर शेकडो वाहनांव्दारे होणाऱ्या वाळू तस्करीसमोर नांग्या टाकणाऱ्या वाहतूक अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिलेल्या अपमानास्पद वागणुकीने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. तालुक्यातील शिरसगाव तांडा येथील राजू बाबूलाल चव्हाण, संजय बिजू पवार, बंडू पांडुरंग राठोड या शेतकऱ्यांनी सोमवारी अंबड येथील मोंढ्यात धान्य नेण्यासाठी गावापासून जवळ असलेल्या करंजळा येथील श्रीहरी आमटे यांचा अ‍ॅपेरिक्षा भाड्याने केला. दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास अंबड शहरात वाहतूक अधिकाऱ्यांनी हा अ‍ॅपेरिक्षा अडविला. यावेळी शेतकऱ्यांनी आम्हाला आमचे धान्य मोंढ्यात न्यायचे आहे. घरातील सदस्य दवाखान्यात असल्याने धान्य आजच विक्री करणे गरजेचे असल्याने आमचे धान्य रिक्षातून उतरुन घेऊ द्या, अशी विनवणी त्यांनी केली. यावेळी बाजरी व तुरीचे पोते फुटून धान्य रस्त्यावर पसरले. धान्य रस्त्यावर पसरताच शेतकऱ्यांच्या अश्रुंचा बांध फुटला. शेतकऱ्यांची अवस्था पाहून संतोष जेधे, सतिश ढवळे, विलास लांडे, अ‍ॅड.कृष्णा शर्मा, बाळासाहेब इंगळे, बाबू लोहकरे, जयसिंग राठोड, रामदास सागुते, बाबू लांडे, सचिन खरात, शिवा लांडे आदींनी वाहतूक अधिकाऱ्यांना जाब विचारला. त्यानंतर वाहतूक अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरुन काढता पाय घेतला, यावेळी संतप्त नागरिकांनी वाहतूक बंद पाडत रास्ता रोको केला. (वार्ताहर)