शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत समित्यांचे कारभारी आज ठरणार

By admin | Updated: September 14, 2014 00:21 IST

औरंगाबाद : अडीच वर्षांचे आरक्षण संपुष्टात आल्याने रविवारी (दि.१४) जिल्ह्यातील ९ पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती पदांसाठी निवडणूक होणार आहे

औरंगाबाद : अडीच वर्षांचे आरक्षण संपुष्टात आल्याने रविवारी (दि.१४) जिल्ह्यातील ९ पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती पदांसाठी निवडणूक होणार आहे. सध्या जिल्ह्यातील ९ पंचायत समित्यांपैकी ६ काँग्रेस आघाडीच्या ताब्यात असून २ शिवसेनेकडे, तर एक अपक्षाच्या ताब्यात आहे. उद्याच्या निवडणुकीत उलटफेर होणार काय, अशी चर्चा शनिवारी दिवसभर रंगली होती. औरंगाबाद पंचायत समितीऔरंगाबाद पंचायत समितीत सध्या काँग्रेसच्या सरसाबाई वाघ सभापती आहेत, तर सर्जेराव चव्हाण हे उपसभापती आहेत. १८ सदस्यीय सभागृहात काँग्रेसचे ५ व राष्ट्रवादीचे २ सदस्य आहेत. दोन अपक्ष व मनसेच्या एका सदस्याच्या पाठिंब्याने गेल्या वेळेस काँग्रेसने हे सभापतीपद पटकावले होते. नुकत्याच जाहीर झालेल्या सातारा- देवळाई नगर परिषदेमुळे काँग्रेसच्या ताब्यात असलेला सातारा गण बरखास्त करण्यात आला. अन्यथा या सभागृहात काँग्रेसचे बळ ६ होते. काँग्रेसचे बळ घटल्यामुळे या वेळेस सभापतीपद खेचून घेण्यासाठी शिवसेना सक्रिय झाली आहे. शिवसेनेचे या सभागृहात ४, भाजपा ३ असे युतीचे संख्या बळ ७ आहे. दोन अपक्षांना गळास लावण्याचा प्रयत्न सेनेने चालविला आहे. शिवसेना- भाजपाचे सदस्य गेल्या तीन दिवसांपासून भंडारदरा येथे सहलीवर गेले आहेत. आज रात्री हे सदस्य शहरात परतणार आहेत. शिवसेनेने गणेश नवले यांना सभापतीपदाचा, तर भाजपाने बळीराम गावंडे यांना उपसभापतीपदाचा उमेदवार ठरविले आहे. काँग्रेसचे सदस्यही गेल्या तीन दिवसांपासून नाशिक, पुणे येथे मुक्कामास होते. ते उद्या पहाटे शहरात दाखल होणार आहेत. काँग्रेसने अद्याप सभापतीपदाचा उमेदवार घोषित केलेला नाही. दोन अपक्ष नेमकी काय भूमिका घेतात, यावरच औरंगाबाद पंचायत समितीचा कारभारी ठरणार आहे.