मराठवाड्यातील पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या स्नेहसंमेलनाला उत्साहात सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 15:45 IST2018-06-28T15:44:11+5:302018-06-28T15:45:42+5:30

पोलीस महासंचालक सतीश माथूर यांच्या उपस्थितीत मराठवाड्यातील पोलीस अधिकारी- कर्मचारी यांच्या स्नेहसंमेलनाला आज सकाळी सुरुवात झाली.

Starting with enthusiasm for the affection of the police officers and employees of Marathwada | मराठवाड्यातील पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या स्नेहसंमेलनाला उत्साहात सुरुवात

मराठवाड्यातील पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या स्नेहसंमेलनाला उत्साहात सुरुवात

औरंगाबाद : पोलीस महासंचालक सतीश माथूर यांच्या उपस्थितीत मराठवाड्यातील पोलीस अधिकारी- कर्मचारी यांच्या स्नेहसंमेलनाला आज सकाळी सुरुवात झाली. यावेळी मराठवाड्यातील पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांची मोठ्याप्रमाणावर उपस्थिती होती.

विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना डीजीपी माथुर यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने त्यांच्या कार्याचा गौरव केला. तसेच यावेळी दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेतील गुणवंत पोलीस पाल्यांचा सत्कार अधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. 

यावेळी व्यासपीठावर पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद ,पोलीस अधीक्षक डॉ आरती सिन्ह , चंद्रशेखर मीना ,रामनाथ पोकळे , अरविंद चावरिया , वसंत परदेशी यांची उपस्थिती होती. सीएमआय आणि पोलीस आयुक्तालय यांच्यातील सामंजस्य कराराच्या कागदपत्रांची देवाण घेवाण यावेळी करण्यात आली.

Web Title: Starting with enthusiasm for the affection of the police officers and employees of Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.