शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बांधकामांचा सपाटा सुरू

By admin | Updated: July 6, 2014 00:34 IST

औरंगाबाद : सातारा- देवळाई नगर परिषद होणार, अशी घोषणा झाली आणि नंतर बांधकामे करणे कठीण होईल म्हणून नागरिकांसह बांधकाम व्यावसायिकांनी प्लॉटवर बांधकामाला गती दिली

औरंगाबाद : सातारा- देवळाई नगर परिषद होणार, अशी घोषणा झाली आणि नंतर बांधकामे करणे कठीण होईल म्हणून नागरिकांसह बांधकाम व्यावसायिकांनी प्लॉटवर बांधकामाला गती दिली असून, एक मजली बांधकाम तीन ते पाच मजल्यांपर्यंत जाऊन पोहोचले आहे. सातारा भागात एन.ए.- ४४ च्या परवानगी बोटावर मोजण्याइतक्याच नागरिकांकडे असून, अनेकांनी ग्रामपंचायतीकडे कोणतीही परवानगी मागितली नसल्याचे चित्र आहे. एनए- ४७ बी साठी महसूल विभागाकडे ग्रामपंचायतीने साडेदहा हजार फायली सादर केल्या आहेत. त्या फायली सिडकोच्या टाऊन प्लॅनिंग विभागात अहवालाशिवाय पडून आहेत. ग्रामपंचायतीचा आवाका पाहता येथील विकास कामांना गती देण्यासाठी शासनाने साताऱ्याला नगर परिषदेचा दर्जा जाहीर करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता साताऱ्यातील मोकळ्या भूखंडावर बांधकाम व्यावसायिकांनी बांधकामाला जोर दिला असून, कामाची गती वाढली आहे. देवळाई परिसरात १५ कामे, तर सातारा परिसरात २५ पेक्षा अधिक कामे सुरू असून देवळाई रोड व रेणुकामाता मंदिर रोडलगत तीन ते पाच मजली इमारती झपाट्याने उभ्या राहत आहेत. नगर परिषद झाल्यावर घर बांधणी व इतर कर नगर परिषदेला अदा करावे लागणार असल्याचे गुपित नागरिकांसह बांधकाम व्यावसायिकांच्या लक्षात आल्याने इमारतीचे सांगाडे झपाट्याने आकाशाकडे झेपावत आहेत. बांधकामाला मजूर मिळत नसल्याने कामगार नाक्याहून नगदी हजेरी देऊन मजूर आणावे लागत आहेत. स्थानिक नागरिकांनीही कोणतीही परवानगी न काढता दुसरा मजला चढविल्याचे प्रकार वाढले आहेत. याची माहिती ग्रामपंचायतीलाही नसल्याचे ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामविकास अधिकारी टी.बी. साळवे यांचे म्हणणे आहे. अधिकारी म्हणतातसिडकोचे वरिष्ठ नियोजनकार आशुतोष उइके यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, एनए- ४७ बी च्या फायलीवर काय करायचे, याविषयी अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. नगर परिषद की ग्रामपंचायत, हा निर्णय अद्याप झालेला नाही. अन्यथा, विनापरवानगी जेही बांधकाम झालेले आहे, त्यांच्यावर केव्हाही कारवाई होऊ शकते.