स्टाफ नर्स नियुक्ती घोटाळा; कॉल रेकॉर्डिंग आले समोर; ‘लोकमत’च्या हाती ध्वनिफीत

By संतोष हिरेमठ | Updated: June 3, 2025 13:00 IST2025-06-03T12:59:34+5:302025-06-03T13:00:03+5:30

त्यामध्ये म्हणतात... हॅलो, ‘डीएमईआर’ची काही नवीन ‘ॲड’ येतेय? ‘डायरेक्ट’ काम करणाऱ्याशी आपला संपर्क

Staff nurse appointment scam; Call recording revealed; Audio tape in hands of 'Lokmat' | स्टाफ नर्स नियुक्ती घोटाळा; कॉल रेकॉर्डिंग आले समोर; ‘लोकमत’च्या हाती ध्वनिफीत

स्टाफ नर्स नियुक्ती घोटाळा; कॉल रेकॉर्डिंग आले समोर; ‘लोकमत’च्या हाती ध्वनिफीत

संतोष हिरेमठ, लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर: ‘२० लाख रुपये मोजा आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांत स्टाफ नर्स म्हणून नियुक्ती मिळवा’, असा उद्योग काहींनी सुरू केला आहे. यासंबंधी काही ‘काॅल रेकाॅर्डिंग’ ‘लोकमत’च्या हाती लागले आहेत. यात भरतीच्या अनुषंगाने संवाद आहे. अन्य एका ‘रेकाॅर्डिंग’मध्ये पैसे परत करण्याची मागणी एकाकडून केली जात आहे. अपात्र उमेदवारांना स्टाफ नर्स, म्हणून नियुक्ती देण्याचा प्रकार राज्यात सुरू आहे. हा प्रकार ‘लोकमत’ने २ जून रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित करून समोर आणला. याची दखल घेत घाटी प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे. गुन्हा दाखल करण्याचा निर्णयही घेतला आहे.

पहिले काॅल रेकाॅर्डिंग....

  • पहिली व्यक्ती : ‘डीएमईआर’ची काही नवीन ॲड येतेय का?
  • दुसरी व्यक्ती : आता का? रिसेंट का?
  • पहिली व्यक्ती : अशी माहिती आली की, सरांनी नवीन ऑर्डर तयार करायला लावली.
  • दुसरी व्यक्ती : आता मागची का?
  • पहिली व्यक्ती : नाही, मागची रद्द झाली म्हणे.
  • दुसरी व्यक्ती : ठीक आहे, बघू, तसे काही झाले नाही. बघू तपास करून.
  • पहिली व्यक्ती : मला कधी सांगणार?
  • दुसरी व्यक्ती : बघतो, अजून काहीच नाही.
  • पहिली व्यक्ती : त्या पोराचा फोन आला होता, अशी माहिती मिळते म्हणून.
  • दुसरी व्यक्ती : कोणाच्या आधारे सांगितली? विचारले मी. कमिटीतील त्यांनी सांगितले की, माहिती नाही. आपला संपर्क फक्त एकाशी आहे, जो मध्ये काम करतो.


दुसरे काॅल रेकाॅर्डिंग...

  • पहिली व्यक्ती : माझे ठरले आहे, तुझ्या घरी यायचे.
  • दुसरी व्यक्ती : थोडा वेळ द्या. येईल.
  • पहिली व्यक्ती : तुझे ऐकायला फोन नाही केला. काही येणार नाही.
  • दुसरी व्यक्ती : येईल, पक्की माहिती आहे. येईल.
  • पहिली व्यक्ती : ६ वाजेपर्यंत इज्जतीत पैसे काढून ठेव. नाही तर घरात घुसून पैसे परत भेटत नाही, तोपर्यंत उठणार नाही.
     

‘स्टाफ नर्स’ची प्रामाणिकपणे परीक्षा देऊन, उत्तीर्ण होऊनही अनेकांना घरी बसावे लागते. तर गैरप्रकाराची ‘एसआयटी’मार्फत चौकशी व्हावी.
-इंदुमती थोरात, राज्याध्यक्ष, महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन

याप्रकरणी गुन्हा दाखल केला जाईल. वरिष्ठ कार्यालयाकडून ई-मेल, ऑर्डर असणाऱ्यांनाच नियुक्ती दिली जाते. 
-डाॅ. शिवाजी सुक्रे, अधिष्ठाता.

Web Title: Staff nurse appointment scam; Call recording revealed; Audio tape in hands of 'Lokmat'