शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
6
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
7
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
8
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
9
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
10
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
11
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
12
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
13
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
14
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
15
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
16
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
17
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
18
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
19
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
20
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
Daily Top 2Weekly Top 5

तरूणाच्या शोधासाठी पथक दिल्लीला रवाना

By admin | Updated: July 7, 2014 00:32 IST

वसमत : आॅनलाईन योजनेत गुंतवलेले पैसे परत आणण्यासाठी दिल्लीला गेलेला वसमतचा तरुण १५ दिवसांपासून बेपत्ता आहे.

वसमत : आॅनलाईन योजनेत गुंतवलेले पैसे परत आणण्यासाठी दिल्लीला गेलेला वसमतचा तरुण १५ दिवसांपासून बेपत्ता आहे. ज्यांच्याकडे पैसे गुंतवले त्याच लोकांनी त्याचा खून करण्याच्या उद्देशाने अपहरण केल्याची तक्रार युवकाच्या भावाने केली आहे. या तरुणाच्या शोधार्थ वसमत पोलिसांचे पथक दिल्लीला रवाना झाले आहे.वसमत येथे औषधी विक्रीचा व्यवसाय करणारा तरुण कैलास यतीराजम नल्लेवार (वय ३३) या युवकाने एका आॅनलाईन योजनेत पैसे गुंतवले होते. गुंतवलेले पैसे मुदतीत परत न आल्याने पैसे वसूल करण्यासाठी सदर तरुणाने दिल्ली गाठली. २३ जून रोजी दिल्लीला पोहोचल्यापासून सदर तरुणाचा त्याच्या कुटुंबियांशी संपर्क झालेला नाही. हा तरुण बेपत्ता झाल्याने कुटुंबियांची शंका बळावली आहे.या प्रकरणी तरुणाचा भाऊ कालीदास नल्लेवार (वय ३७) याने वसमत पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीत कैलास याने आरोपी मनिष शर्मा व गौतम यांच्याकडे पैसे गुंतवले होते. पैसे परत आणण्यासाठी कैलास गेला असता आरोपींनी त्याचा खून करण्याच्या इराद्याने पळवून नेल्याची तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून वसमत पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा नोंदवून ५ जुलै रोजी वसमत पोलिसांचे पथक पहाडगंज दिल्ली भागात रवाना झाले आहे. या पथकात उपविभागीय पोलिस अधिकारी पियुष जगताप, फौजदार रामेश्वर कायंदे व अन्य कर्मचारी सहभागी आहेत. आॅनलाईन स्किममध्ये पैसे गुंतवून दुप्पट- तिप्पट लाभ देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. मात्र आता पैसे वसूल करण्याचा प्रयत्न करण्यासाठी गेलेला तरुणच बेपत्ता झाल्याची घटना घडल्याने परिसरातील खळबळ उडाली आहे. वसमत पोलिसांचे दिल्लीला पोहोचलेले पथक या प्रकरणाचा छडा कसा लावते? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (वार्ताहर)आॅनलाईन स्किममध्ये पैैसे तिप्पट देण्याचे आमिष वसमत येथील तरुण कैलास यतीराजम नल्लेवार (३३) या युवकाने एका आॅनलाईन योजनेत गुंतवलेले पैसे मुदतीत परत न आल्याने पैसे वसूल करण्यासाठी सदर तरुणाने दिल्ली गाठली. २३ जून रोजी दिल्लीला पोहोचल्यानंतर तरुणाचा त्याच्या कुटूंबियांशी संपर्क झाला नसल्याने हा तरुण बेपत्ता झाल्याने कुटुंंबियांची शंका. गुंतवलेले पैसे परत आणण्यासाठी कैलास दिल्लीत गेला असता आरोपींना त्याचा खून करण्याच्या इराद्याने पळवून नेल्याची तक्रार युवकाच्या नातेवाईकानी पोलिसांत दिली. बेपत्ता युवकाच्या शोधासाठी वसमत पोलिसांचे पथक दिल्लीला पोहोचले असून या प्रकरणाचा छडा कसा लावते? याकडे सर्वांच्या नजरा आहेत.